सीएसचा निकाल जाहीर

कोईम्बतुरचा गोकुल आर. हा नव्या अभ्यासक्रमातून देशातून पहिला आहे. दरम्यान सीएसची पुढील परीक्षा २० ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे.

Mumbai
online result
प्रातिनिधीक फोटो

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून जून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी (सीएस)परीक्षेच्या एक्झिक्युटीव्ह व प्रोफेनल प्रोग्रामच्या नव्या व जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. एक्झिक्युटीव्ह प्रोग्राममध्ये अजमेरची खुशी अगरवाल ही जुन्या तर कोईम्बतुरचा गोकुल आर. हा नव्या अभ्यासक्रमातून देशातून पहिला आहे. तर प्रोफेशनल प्रोग्राममधून कानपूरची तान्या खतुरिया व जयपूरची कीर्ति खंडेलवाल देशभरातून प्रथम आल्या आहेत. दरम्यान सीएसची पुढील परीक्षा २० ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे.

हेही वाचा – हे सुवर्णपदक आईचं बर्थडे गिफ्ट – सिंधू

असा आहे निकाल

सीएसच्या एक्झिक्युटीव्ह व प्रोफेशनल प्रोग्रामच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये एक्झिक्युटीव्ह प्रोग्रामच्या नव्या अभ्यासक्रमामध्ये मॉड्यूल १ चा निकाल १०.२२ टक्के तर मॉड्यूल २चा निकाल ८.६० टक्के लागला. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या मॉड्यूल १ चा निकाल ११.५१ तर माड्यूल २ चा निकाल १६.७८ टक्के लागला. त्याचप्रमाणे प्रोफेशनल प्रोग्रामच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या मॉड्यूल १ चा निकाल २७.१३ तर माड्यूल २ चा निकाल ३३.३४ टक्के लागला. तसेच नव्या अभ्यासक्रमाच्या मॉड्यूल १ चा निकाल २७.८२ तर मॉड्यूल २ चा निकाल २७.७६ टक्के इतका लागला. सीएसचा जाहीर झालेला निकाल परीक्षार्थींना www.icsi.edu या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. परीक्षार्थींना संकेतस्थळावरून ई निकाल व मार्कशीट डाऊनलोड करता येणार आहे. दरम्यान सीएसची पुढील परीक्षा २० ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे.