डी.के. रावचा साथीदार टी. पी. राजाची हत्या

mumbai
two group clashes in kolhapur
प्रातिनीधीक फोटो

कुख्यात गुंड डी. के. राव याचा साथीदार टी. पी. राजा याची दोन अनोळखी मारेकर्‍यांनी घरात घुसून निर्घृणरित्या हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी प्रतीक्षा नगर येथे घडली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी अनोळखी मारेकर्‍यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मारीमुतु पेरियस्वामी देवेंद्रा उर्फ टी. पी. राजा (४०)असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. टी. पी. राजा हा नुकताच तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासह गावी राहण्यास गेला होता. चुलत भावाचे लग्न असल्यामुळे टी. पी. राजा हा काही दिवसांपूर्वी मुंबई आला होता. शुक्रवारी दुपारी प्रतीक्षानगर येथे आपल्या जुन्या घरात तो एकटाच असताना दोन अनोळखी इसम त्याला भेटण्याच्या निमित्ताने आले. त्यांनी काही कळण्याच्या आत स्वतःजवळील धारदार शस्त्राने राजाच्या शरीरावर वार केले. त्यानंतर मारेकर्‍यांनी मोटारसायकल वरून पळ काढला. टी. पी. राजाने जखमी अवस्थेत खिडकीतून मदतीसाठी लोकांना बोलावले.

स्थनिकांनी पोलिसांना कळवले असता वडाळा टी. टी. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. टी. पी. राजा हा कुख्यात गुंड डी. के. राव याचा साथीदार होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद होती. त्याला मोक्कादेखील लावण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांनी अनोळखी मारेकर्‍यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here