घरताज्या घडामोडीखासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे खंडणीची मागणी

खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे खंडणीची मागणी

Subscribe

खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एका २५ वर्षांच्या तरुणाला कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कुमैल मोहम्मद हनीफ पटनी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

२१ वर्षांची ही तरुणी मालाड परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिच्या नावाने अज्ञात व्यक्तीने चार बोगस इन्टाग्राम अकाऊंट सुरू केले होते. त्यात तिचे काही खासगी व्हिडिओ तसेच फोटोचे स्क्रिनशॉट पाठवून ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी सुरू केली होती. ३० जून ते १० जुलैदरम्यान या अज्ञात व्यक्तीचे तिचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती. तसे न करण्यासाठी तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करीत होता. तो तिला कॉलेज जीवनापासून ओळखत असल्याचेही सांगत होता, त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला.

- Advertisement -

ही माहिती समजताच त्यांना धक्काच बसला होता, त्यानंतर त्यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह खंडणी तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच त्याचा बांगुरनगर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करीत होते. हा तपास सुरू असतानाच पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकाने वांद्रे येथील कार्टर रोड, शेरले राजन रोडवरील जॉरेल व्हिला इमारतीमध्ये राहणार्‍या कुमैल मोहम्मद पटनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने तरुणीचे बोगस इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडून तिला तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आले.

त्याला तिचे काही जुने व्हिडिओ त्याच्या परिचित तरुणाकडून मिळाले होते, ते व्हिडिओ मिळाल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करून खंडणीसाठी धमकी देण्यास सुरुवात केली होती. मात्र गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल होताच काही तासांत तांत्रिक माहितीवरुन आरोपीस अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -