घरमुंबईसावधान... ठाणे, कल्याणात डेंग्यू हातपाय पसरतोय!

सावधान… ठाणे, कल्याणात डेंग्यू हातपाय पसरतोय!

Subscribe

कल्याणात एकाच कुटूंबात पाच जणांना डेंग्यूची लागण

खराब हवामानामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढल्याने ठाणे, कल्याण डोंबिवली शहरात डेंग्यूच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. आतापर्यंत ठाण्यात डेंग्यूने तीन जणांचा बळी घेतला आहे तर कल्याणात एकाचा बळी घेतल्यानंतर आता एकाच कुटूंबातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवलीत डेंग्यू हातपाय पसरत असल्याचे दिसून येतय.गेल्या पाच महिन्यात ठाण्यात ७४ तर कल्याण डोंबिवलीत सुमारे २७५ डेंग्यू संशयित रूग्ण आढळून आले आहेत. कल्याण पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात राहणारे लक्ष्मी टोकेकर वय ५४ त्यांची मुलं गणेश ३३ वर्षे विनोद ३८ वर्षे आणि नातवंड मृणाल वय ६ वर्षे आणि सई १० वर्षे अशी पाच जणांची नावे आहेत. यातील लक्ष्मी आणि गणेश यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून सई आणि गणेशवरही वैद्यकिय अहवाल आल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले आहे.

पालिका यंत्रणेची धावपळ

त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकिय पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. कल्याण पूर्व हा परिसर दाटीवाटीचा आणि स्वच्छतेचा अभाव असलेला परिसर आहे. त्यामुळे या परिसरात स्वच्छतेची मोहमी राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक राहुल दामले, शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनाही डेंग्यूची लागण झाली होती. कल्याण पश्चिमेतील गणेश नगर परिसरात राहणारा शुभम शिवदे या तरूणाचा डेंग्यूने पहिला बळी घेतला आहे. आता एकाच घरात पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याने पालिकेच्या यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

- Advertisement -

डेंग्यूने बळी गेल्याने युवक कांग्रेसकडून थाळीनाद आंदोलन

ठाण्यातही डेंग्यूच्या आजाराचा शिरकाव झाला आहे. जून महिन्यात मुंब्रा परिसरातील चांदनगर येथील१ ४ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यानंतर २७ जूनला मोहमद आकिब कमल अहमद शेख या ७ वर्षीय चिमुरडयाचा मृत्यू झाला होता. एका महिन्यात डेंग्यूने दोनबळी गेल्याने युवक कांग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर केालशेत रोडमधील लाेढा अमारा गृहसंकुलात राहणारे सहदेव सिंग यांचाही डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. तसेच पालिकेच्या कळवा रूग्णालयातील पाच शिकाऊ डॉक्टरांनाही डेंग्यूची लागण झाली होती. त्यावेळी आरोग्य विभागाने केलेल्या तपासणी मोहिमेत काही ठिकाणी डेंग्यूच्या आळया आढळून आल्या होत्या. त्यावेळी स्वच्छतेची मोहिम राबविण्यात आली होती.

काय म्हणते पालिका

वातावरणातील बदलामुळे डेंग्यूच्या आजराची लागण होत आहे. तसेच साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची निर्मिती होती त्यामुळे जास्त काळ पाणी साचून ठेवू नये. स्वच्छता पाळावी. डेंग्यूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेचे वैद्यकिय तसेच आरोग्य विभागाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. आरोग्याच्या समस्या बाबत लोकांनीही जागरूक राहवं. डेंग्यू आढळलेल्या ठिकाणी पालिकेचे पथकांकडून पाहणी करून रक्ताची तपासणी केली जात आहे तसेच त्या ठिकाणी पालिकेकडून धूर व जंतूनाशक फवारणीही केली जात आहे.


केडीएमसीकडून….काडीचा आधार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -