घरमुंबई६५ वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी

६५ वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी

Subscribe

दोन वेळा बायपास झालेल्या रुग्णावर गुंतागुंतीची व किचकट शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

दक्षिण मुंबईतील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमध्ये अत्यंत नाजूक परिस्थितीत दाखल झालेल्या बिर्ला या ६५ वर्षीय रुग्णाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. कार्डिओ थोरिअॅक शल्यविशारद डॉ. मंगेश कोहळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अत्यंत गुंतागुंतीची व किचकट शस्त्रक्रिया केली. बिर्ला यांच्यावर दुसऱ्यांदा मोठी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. करोनरी अर्टरी बायपास ग्राफ्ट शस्त्रक्रियेत येणारे व्यंग आणि मृत्यू लक्षात घेता वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या शस्त्रक्रियेचा फार वापर करण्यात येत नाही. मात्र या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे प्राण वाचवण्यात आले. या रुग्णाला एक नवी संजीवनी मिळाली असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांचे मत

करोनरी अर्टरी बायपास शस्त्रक्रिया (सीएबीजी) आणि झडप प्रत्यारोपण या सातत्याने वाढ होत आहे. तब्बल ४०% वृद्धांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकार आहे. या वयोगटात होणाऱ्या मृत्यूंपैकी ५०% रुग्णांचा मृत्यू होतो. सीएबीजीसारख्या शस्त्रक्रियेमुळे या रुग्णांचे आरोग्य सुधारते, ते अधिक कार्यक्षम होतात, आयुष्य वाढते आणि जीवनाचा दर्जाही उंचावतो असे डॉक्टरांचे मत आहे.

- Advertisement -

श्वास घेण्यास त्रास

बिर्ला यांना हृदयविकार होता. त्यांनी २००७ मध्ये ३ वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांवर उपचार करण्यासाठी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. १० वर्षांनी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि पायऱ्या चढणे कठीण होऊ लागले आणि छातीत वेदना होत होत्या. अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या प्रमुख रक्तवाहिनीमध्ये मोठी गुठळी आढळून आली. त्यांनंतर २ महिने ते औषधोपचार घेत होते. पण त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे ती गुठळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सुचवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -