घरमुंबईरोजच्या लेटमार्कमुळे जाॅब जाण्याची वेळ; प्रवाशांचा संताप

रोजच्या लेटमार्कमुळे जाॅब जाण्याची वेळ; प्रवाशांचा संताप

Subscribe

रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजीवकुमार जैन हे प्रवासी संघटनेबरोबर बैठक घेत नसल्याने प्रवासी संघटनांमध्ये नाराजी.

गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रोजच्या लेटमार्कमुळे जाॅब जाण्याची वेळ आली असल्याच्या संतप्त भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहेत. सततच्या विलंबामुळे लोकल प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मात्र रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजीवकुमार जैन हे प्रवासी संघटनेबरोबर बैठक घेत नसल्याने प्रवासी संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे डीआरएम यांनी प्रवासी संघटनेबरोबर बैठक घेऊन चर्चा करावी यासाठी विविध संघटनांनी एकत्रित येत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) यांच्या माध्यमातून मागणी केली आहे. अन्यथा प्रवाशांनी आंदोलन केल्यास प्रवासी संघटनेची मदत मागू नये, असा इशाराच रेल्वे प्रवासी संघटनेने डीआरएमला दिला आहे.

रेल्वेच्या व्यवस्थापकांना प्रवाशांचे निवेदन

सलग दोन दिवसांपासून रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवासी त्रस्त झाले असतानाच बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे सेवा १० ते १५ मिनीटे उशिराने धावत होती. सकाळी चाकरमन्यांच्या कामावर जाण्याच्या वेळेतच लोकल सेवा उशिरा धावत असल्याने नेहमीच्या त्रासाला प्रवासी कंटाळले आहेत. त्यामुळे चाकरमन्यांना ऑफीसमध्ये पोहचण्यास उशीर होत आहे. त्यातच गर्दीचाही सामना करीत प्रवास करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हे घडत असल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.

- Advertisement -

मेगाब्लॉक घेवूनसुद्धा समस्या सुटत नाहीत ?

दरवेळी होणारे प्रॉब्लेम त्यामुळे प्रवाशांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहमी लेट मार्क लागत असल्यामुळे आम्हाला जॉब जाण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो मग त्यादरम्यान काय काम केली जातात.. दर आठवड्यात मेगाब्लॉक करून देखील समस्या सुटत नाहीत का ? असा संतप्त सवालही करण्यात आला आहे. प्रवाशांच्या समस्यांसदंर्भात रेल्वेच्या डीआरएम यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागूनही वेळ दिली जात नसल्याची नाराजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

प्रवासी संघटनेच्या ७ ते ८ संघटनांनी मिळून एकत्रितपणे रेल्वेचे डीआरएम संजीवकुमार जैन यांना निवेदन दिले आहे. मध्य रेल्वेची दयनीय अवस्था झाली आहे. त्याला कारणं काय आहेत. कुठल्या कारणांमुळे हे रोजचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यासाठी डीआरएम यांनी प्रवासी संघटनेशी चर्चा करावी आणि त्यांचे म्हणणे मांडावे, अशी मागणी निवेदानात करण्यात आली आहे. मात्र डीआरएम संजीवकुमार जैन हे कोणत्याही प्रवासी संघटनेसोबत बैठक आयोजित करीत नाही. त्यामुळे डीआरएम यांनी प्रवासी संघटनेला बैठकीला बोलावले पाहिजे. अन्यथा प्रवाशांनी आंदोलन केले तर त्यांनी प्रवासी संघटनेची मदत मागू नये. कारण ते प्रवासी संघटनेला बैठक देण्याच्या विरोधात आहेत.
लता अरगडे, सरचिटणीस रेल्वे प्रवासी संघटना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -