घरमुंबईनिवडणुक कालावधीत भिवंडीत पोलिसांकडून ५४५ शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरु

निवडणुक कालावधीत भिवंडीत पोलिसांकडून ५४५ शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरु

Subscribe

भिवंडीत मतमोजणी प्रक्रिया शांतता तसेच कायदा सुव्यवस्थेमध्ये पार पडावी या साठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोगाच्या आदेशा नुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या मतदार संघात निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रिया शांतता तसेच कायदा सुव्यवस्थेमध्ये पार पडावी या साठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत सुमारे १५० परवाना धारक शस्त्र जमा करण्यात आली आहेत. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील राजकीय जाहिरात प्रकाशित करण्या आधी निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून संबंधित पोलीस ठाण्याचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय जाहिरात प्रसिद्द केल्यास, आचारसंहितेच्या आदेशाचा भंग या कलमा खाली गुन्हे दाखल करण्यात येईल. असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस उपायुक्त यांनी दिला आहे.

शस्त्रधारकांना नोटीस

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वजनिक निवडणूक २०१९ कार्यक्रम जाहीर केला असून १० मार्च पासून आदर्श आचार संहिता लागु झाली आहे. निवडणुकीदरम्यान बळ, पैसा, आमिष यांचा वापर होणार नाही, याकडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागते. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. शहरात पोलिस आयुक्त, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यां मार्फत हे काम पार पडते. शहर आणि ग्रामीण भागात आजमितीस ५४५ परवानाधारक शस्त्रधारक आहेत. यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त करण्यात येते. परवानाधारक शस्त्र असलेल्या व्यक्तींना नोटिसा बजावून शस्त्र जमा करण्यास सांगण्यात येते. यानंतर ती व्यक्ती कमिटीसमोर आपली बाजू मांडू शकते. संबंधित व्यक्तीला शस्त्राची गरज किती किंवा कसे, याबाबतचा निर्णय कमिटी घेते. यात त्या व्यक्तीच्या जिवाला असलेला धोका आणि त्याबाबतचा संबंधित पोलिस स्टेशनचा अहवाल, तसेच परिमंडळ निहाय उपायुक्तांचे मत विचारात घेतले जाते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

पोलिसांची करडी नजर

आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी पोलीस दक्ष असून, महसूल आणि पोलीस विभागाचे संयुक्त फिरते पथक तैनात करण्यात येत आहे. नाकाबंदी आणि सातत्याने गस्त याद्वारे याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी स्पष्ट केले. अवैध मद्य वाहतूक, पैशांची उलाढाल याकडे पोलिसांचे लक्ष असून, २४ तास याकडे लक्ष पूरवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भिवंडी लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे अचारसंहिता लागू होऊन निवडणूक निर्णय अधिकारी भिवंडीत येऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच मतमोजणी केंद्राची जागा निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे .

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -