घरताज्या घडामोडीयंदाच्या पावसाळ्यात समुद्राला ४.५ मीटरपेक्षा मोठ्या उंचीच्या भरती येणार

यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला ४.५ मीटरपेक्षा मोठ्या उंचीच्या भरती येणार

Subscribe

विशेष म्हणजे जुन महिन्यात ७ दिवस अधिक उंचीच्या भरती येत असून गुरुवार ते शनिवार या चार दिवसांमध्ये सर्वात उंचीची भरती समुद्राला येणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २४ दिवस धोक्याचे असून चार महिन्यात या २४ दिवसांमध्ये मोठ्या उंचीच्या अर्थात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भरती समुद्राला येणार आहे. त्यामुळे या मोठ्या भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास मुंबई जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे जुन महिन्यात ७ दिवस अधिक उंचीच्या भरती येत असून गुरुवार ते शनिवार या चार दिवसांमध्ये सर्वात उंचीची भरती समुद्राला येणार आहे.

मोठ्या उंचीच्या भरती या जुन महिन्यात सात दिवस, जुलै महिन्यात ८ दिवस, ऑगस्ट महिन्यात ४ दिवस आणि सप्टेंबर महिन्यात ५ दिवस येणार आहेत. यामध्ये सर्वात मोठ्या उंचीची भरती ही ४.८२ मीटरची असून ही भरती जुन महिन्याच्या ६ तारखेला येणार आहे. त्याखालोखाल ४.७८ मीटर उंचीची भरती रविवार ७ जून रोजी येणार आहे.

- Advertisement -
मोठ्या उंचीच्या लाटा
मोठ्या उंचीच्या लाटा

विशेष म्हणजे ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ येत असून समुद्राला ४ जून रोजी ४.५८ मीटरची भरती येणार आहे. त्यामुळे थोडक्यात धोका कमी झाला आहे. अन्यथा ४ तारखेला निसर्ग चक्रीवादळ अlले असते तर सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहावे लागले असते आणि धोकाही अधिक वाढला असता.

पावसाळ्यातील उंच भरतीचे दिवस

जून २०२०

- Advertisement -

गुरुवार ४ जून २०२० : वेळ सकाळी १० वा.५५ मि. (४.५६ मीटर)

शुक्रवार ५ जून २०२० : वेळ सकाळी ११ वा.४५ मि. (४.७५ मीटर)

शनिवार ६ जून २०२० : वेळ दुपारी १२ वा.३३ मि. (४.८२ मीटर)

रविवार ७ जून २०२० : वेळ दुपारी  ०१ वा. १९ मि. (४.७८ मीटर)

सोमवार ०८ जून २०२०: वेळ दुपारी ०२वा.४ मि.  ( ४.६७ मीटर)

मंगळवार २३ जून २०२०: वेळ दुपारी ०१ वा.४३ मि. ( ४.५२ मीटर)

बुधवारी  २४ जून २०२०: वेळ दुपारी ०२वा.२५ मि. ( ४.६७ मीटर)

 जुलै २०२०

शनिवार ०४ जुलै २०२०: वेळ सकाळी   ११ वा. ३८ मि.  ( ४.५७ मीटर)

रविवार  ०५ जुलै २०२०: वेळ दुपारी   १२ वा.  २३ मि.  ( ४.६३ मीटर)

सोमवार ०६ जुलै २०२०: वेळ दुपार   ०१ वा. ०६ मि.  ( ४.६२ मीटर)

मंगळवार ०७ जुलै २०२०: वेळ दुपारी   ०१ वा. ४६ मि.  ( ४.५४ मीटर)

मंगळवार २१ जुलै २०२०: वेळ दुपारी  १२ वा.  ४३ मि.  ( ४.५४ मीटर)

बुधवार  २२ जुलै २०२०: वेळ दुपारी   ०१ वा.  २२ मि.  ( ४.६३ मीटर)

गुरुवार  २३ जुलै २०२०:   वेळ दुपारी     ०२  वा. ०३ मि.  ( ४.६६ मीटर)

शुक्रवार २४ जुलै २०२०: वेळ  दुपारी   ०२ वा.  ४५  मि.  ( ४.६१ मीटर)

ऑगस्ट २०२०

बुधवार १९ ऑगस्ट २०२० : वेळ दुपारी १२ वा. १७ मि. (४.६१ मीटर)

गुरुवार  २० ऑगस्ट २०२० : वेळ दुपारी १२ वा. ५५  मि. (४.७३ मीटर)

शुक्रवार  २१ ऑगस्ट २०२० : वेळ दुपारी ०१ वा.  ३३ मि. (४.७५ मीटर)

शनिवार  २२  ऑगस्ट २०२० : वेळ दुपारी २ वा.  १४ मि. (४.६७ मीटर)

सप्टेंबर २०२०

गुरुवार १७ सप्टेंबर २०२०: वेळ सकाळी  ११ वा. ४७ मि. (४.६६ मीटर)

शुक्रवार १८ सप्टेंबर २०२०: वेळ दुपारी  १२ वा. २४  मि. (४.७७ मीटर)

शनिवार १९ सप्टेंबर २०२०: वेळ मध्यरात्र  ०० वा. ४५ मि. (४.६८ मीटर)

शनिवार १९  सप्टेंबर २०२०: वेळ दुपारी  ०१ वा. ४४० मि. (४.७६ मीटर)

रविवार  २० सप्टेंबर २०२०: वेळ मध्यरात्र  ०१ वा. २९ मि. (४.७६ मीटर)

रविवार   २० सप्टेंबर २०२०: वेळ दुपारी   ०१ वा. ४० मि. (४.६२ मीटर)

सोमवार  २१ सप्टेंबर २०२०: वेळ  दुपारी  ०२ वा. १५ मि. (४.६८ मीटर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -