घरताज्या घडामोडीखुशखबर! लोकलमध्ये पाहता येणार फ्रीमध्ये मालिका, सिनेमा

खुशखबर! लोकलमध्ये पाहता येणार फ्रीमध्ये मालिका, सिनेमा

Subscribe

आता लोकलमधल्या प्रवाशांचे मोफत मनोरंजन होणार आहे. या 'कन्टेंट ऑन डिमांड' सेवेसाठी मे. मार्गो नेटवर्कची निवड केली आहे.

लोकलमधून प्रवास करताना आपल्याला गाणी, चित्रपट किंवा मालिका पाहण्याची सवय असते. मात्र अनेक वेळा नेटवर्कमुळे हे पाहण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आता लवकरच लोकलमध्ये मोफत हॉटस्पॉट वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे गाणी, चित्रपट, मालिका मोफत पाहता येणार आहे. तसंच या ‘कन्टेंट ऑन डिमांड’ सेवेमुळे प्रवाशांचे मनोरंजन होणार आहे. रेलटेल कंपनीने या सेवेसाठी डिजिटल एंटरटेनमेंट सर्विस प्रोवायडर म्हणून मे. मार्गो नेटवर्कची निवड केली आहे. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी फुलटू धमाल असणार आहे.

याशिवाय देशभरातील सर्व प्रीमियम गाड्या, लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमधील देखील प्रवाशांचे मोफत मनोरंजन होणार आहे. यामध्ये रेल्वेचे १७ झोन कव्हर केले जातील. रेलटेल कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी असं स्पष्ट केलं की, विक्रेंद्रीयकरणाच्या या मॉडेलमुळे ‘नॉनफेअर रेव्हेन्यू’ अंतर्गत रेल्वेला महसूल मिळणार आहे. या सेवेमध्ये ५५६३ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. तसंच हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऑनलाईन लॉटरी बंद होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -