माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते.

2Arvind-Inamdar

राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते.

जळगावमधील गाजलेलं सेक्स स्कँडल प्रकरण अरविंद इनामदार यांनी यशस्वीपणे हाताळलं होतं. आपल्या कार्यकाळात त्यांनी पोलीस दलातील वाईट गोष्टींवर सतत प्रहार केला. अरविंद इनामदार यांनी खोटे आणि चुकीचे घडलेले कधीच आवडत नसे. या सद्गुणांमुळेच मला त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी अनेकदा मुलाखतींमधून सांगितले होते. पोलीस दलात कार्यरत असूनही इनामदार मनाने अतिशय संवेदनशील होते. त्यांनी नेहमीच माणुसकी जपली. आपल्यावर भगवद्गगीतेचा प्रभाव असल्याचे ते नेहमी सांगत. कर्तव्यदक्ष पोलीस अशी ख्याती मिळवलेले इनामदार हे साहित्य वर्तुळात सुद्धा तेवढेच लोकप्रिय होते.