घरमुंबईमुंबईतून पाच बोगस डॉक्टरांना अटक

मुंबईतून पाच बोगस डॉक्टरांना अटक

Subscribe

मुंबईतील पाच बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. शमशेर कादिर शेख, अन्वर अकबर हुसैन, नईम मोहमदमिया शेख, नवाब अजसर हुसैन आणि रिझवानउद्दीन फईमउद्दीन बंजारा अशी या पाच जणांची नावे आहेत. या पाचही आरोपींकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना ते वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय

भायखळा, नागपाडा, ग्रॅटरोड आणि लोअरपरेल परिसरात काही डॉक्टर कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती युनिट तीनच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी भायखळा येथील जनसेवक आयुवैदिक, नागपाड्यातील अमर देशी दवाखाना, शाही दवाखाना, ग्रँटरोड येथील कमर दवाखाना तसेच लोअर परेल येथील मॉर्डन दवाखाना येथे छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी शमशेर शेख, अन्वर हुसैन, नबाव हुसैन, रिझवानउद्दीन आणि नईम शेख या पाचजणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत त्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले आहे. ते पाचही बोगस डॉक्टर असून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली नव्हती, तरीही ते दुसर्‍या डॉक्टरांच्या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

बोगस डॉक्टरांचे शिक्षण

शमशेर याचे शिक्षण झाले नसून अन्वर हा दहावी, नईम सातवी, नबाव बारावी तर रिझवान उद्दीनचे आठवीपर्यंत शिक्षण झाले होते. ते सर्वजण रेल्वे स्थानके, सार्वजनिक शौचालये, पोस्ट ऑफिस, इलेक्ट्रीक सप्लाय बॉक्ससारख्या ठिकाणी दवाखान्याची बोगस जाहिरात करुन रुग्णांची फसवणुक करीत होते. या जाहिरातीमध्ये रुग्णांच्या लैगिंक समस्याचे त्वरीत निराकरण करण्याची हमी देत होते. तसेच उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना बोगस औषध देऊन त्यांच्याकडे जास्त पैसे उकाळत होते. अशाप्रकारे त्यांनी अनेक रुग्णांच्या जिवाशी खेळ केला होता. या पाचही बोगस डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशनर्स कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यात त्यांना बुधवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना १९ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – पतीनेच केली पत्नीची हत्या; पायातील पैजणांनी उघडकीस आला गुन्हा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -