घरताज्या घडामोडीVideo: मुंबईतील नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग

Video: मुंबईतील नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग

Subscribe

मुंबईच्या नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. अग्निशमन विभागाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तसेच आगीमध्ये कोणालाही इजा किंवा जीवतहानी झालेले नाही. मुंबई सेंट्रल येथील क्लासिक रोडवर हा मॉल आहे. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल ३ ची आग म्हणून घोषित केले आहे.

- Advertisement -

या आगीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागण्याच्या वेळेस मॉलमध्ये काही नागरिक उपस्थित होते. आग पेटल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट मॉलमधून बाहेर येताना दिसत होते. प्रत्यक्षदर्शीने याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती टाइम्स नाऊ मराठीने दिली आहे.

- Advertisement -

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मॉलमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. आता ही आग कशामुळे लागली? याचा शोध घेतला जात आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -