घरमुंबईमुंबईत पहिल्यांदाच परदेशी व्यक्तीचे अवयवदान

मुंबईत पहिल्यांदाच परदेशी व्यक्तीचे अवयवदान

Subscribe

नेपाळचे नागरिकत्व असलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीने नवी मुंबईतील अपोलो रूग्णालयात अवयवदान करण्यात आले आहे. रुक बहादूर असे या अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

मुंबईसह देशभरात अवयवदानाबाबतची जनजागृती वाढलेली पाहायला मिळत आहे. मुंबईत पहिल्यांदाच एका परदेशी व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले आहेत. या व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे हे मुंबईतील २४ वे अवयवदान ठरले आहे. नेपाळचे नागरिकत्व असलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीने नवी मुंबईतील अपोलो रूग्णालयात अवयवदान करण्यात आले आहे. रुक बहादूर असे या अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. यांच्या दोन्ही किडन्या दान करण्यात आल्यामुळे दोन रूग्णांना नव्याने जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे.

कुटुंबीयांनी तात्काळ दिली परवानगी

१० मार्च रोजी रुक बहादूर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. पण, उपचारांना त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अखेर १३ मार्च रोजी त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, बहादूर यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाविषयी सांगण्यात आले. अवयवदानाविषयी माहिती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ तयारी दाखवत परवानगी दिली. त्यांच्या दोन्ही किडन्या दान करण्यात आल्या आहेत. यांची एक किडनी अपोलो हॉस्पिटलमधील ५२ वर्षीय महिलेच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली आहे. तर, दुसरी किडनी सायन हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आली आहे.

- Advertisement -

रूग्णालयाने दिली माहिती

दरम्यान, अपोलो रूग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, “रुक बहादूर यांना १० मार्च रोजी नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या डोक्याला फार गंभीर दुखापत झाली होती. डोक्यात रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना १३ मार्च रोजी ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा नेपाळहून तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याची परवानगी दिली.

परदेशी व्यक्तींचे अवयवदान

रुक बहादूर हे मुंबईतील पहिले परदेशी अवयवदाता बनले आहेत. भारतात यापूर्वी दिल्लीमध्ये फ्रान्सचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले होते. याशिवाय चेन्नईमध्ये देखील दोन परदेशी व्यक्तींचे अवयवदान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -