घरमुंबईही शान कोणाची...

ही शान कोणाची…

Subscribe

मुंबईसह राज्यात सोमवारपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा जल्लोष हा पाहण्याजोगे असतो. आर्कषक देखावा आणि उंच गणेशमर्ती हे सर्व गणेशभक्तांचे आर्कषणाचे केंद्रबिंदू ठरतात. त्यानुसार मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी राज्यातून लोक येत असतात. अशा या मुंबईत प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवात मुंबईत नेमकं काय काय पाहाल, याबाबत आपलं महानगरने घेतलेला आढावा

लालबागचा राजा
कोट्यावधी भाविकांचा श्रध्दास्थान असलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून गणेशभक्त मोठ्या प्रमाणात लालबाग गाठत असतात. यंदा मंडळाचे ८६ वे वर्ष असून त्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठानेसाठी राजमहलची प्रतिकृती बनविण्यात येत आहे. बाप्पाची आर्कषक मुर्ती आणि प्रभावळ हे येथील आर्कषणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असणार्‍या या गणपतीचे मुखदर्शन आणि नवसाची रांग अशा दोन पध्दतीने भक्तांना दर्शन घेता येत असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

घोडपदेवचा राजा
गिरणी कामगारांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला घोडपदेवचा राजा हा मुंबईतील एका प्रमुख मंडळापैकी एक मंडळ आहे. यंदापासून मंडळाने इको फ्रेंडली गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. विशेष पध्दतीने घालण्यात येणारे गाराणं हे येथील आर्कषण मानले जाते. यंदा मंडळाचे ८५ वे वर्षे असून मंडळाकडून दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. मंडळाकडून दरवर्षी स्थानिक विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता मोफत एसएससी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.

- Advertisement -

फोर्टचा इच्छापुर्ती गणेश
फोर्टच्या इच्छापुर्ती गणेशसाठी यंदा आलिशान असा महाल तयार करण्यात आला आहे. महालातील बारीक नक्षीचे काम करण्यासाठी राजस्थानहून कारागिर आणण्यात आले आहेत. याच कारागिरांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई यांच्या मंडपासाठी काम करून आता मुंबई गाठली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून याठिकाणी हा आलिशान महाल उभारणीचे काम सुरू आहे. फोर्टच्या इच्छाशक्ती गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी उभारण्यात येणारा देखावा. यंदाही राजस्थानी महालाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या गणेशोत्सव मंडळाची सुरूवात केली. आतापर्यंत शिर्डी, कोल्हापूरची महालक्ष्मी, १२ ज्योतिर्लिंगे, नवसाला पावणारे २१ गणपती तसेच जगभरातील ६० गणपती अशा विविध देखावे या मंडळाने साकारलेले आहेत.

सह्याद्री क्रीडा मंडळ, चेंबूर
सह्याद्री क्रीडा गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ आहे. हे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी मंदिराचा देखावा उभारत असते. या वर्षी मंडळाकडून श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्यात आले आहे. टिळक नगरमधील सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना १९७७ साली करण्यात आली होती. या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे या ४3 वं वर्ष आहे.

- Advertisement -

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली
आपल्या आर्कषक देखाव्यासाठी आणि उंच मुर्तीसाठी प्रसिद्ध असणार्‍या लालबाग येथील गणेशगल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे मंडळाचे ९२ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी प्रमाणे मंडळाने यंदाही सामाजिक कामांच्या माध्यमातून मुंबईतील इतर मंडळांसमोर आपला वेगळा आदर्श ठेवला आहे.

काळाचौकीचा महागणपती
आपल्या पारंपारिक मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेले काळाचौकी येथील काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा प्रति पंढरपूरचे प्रतिकृती उभारण्यात आली आहे. देखाव्याला साजेशी असी विठ्ठलरुपी १८ फूटी गणेशमूर्ती मुंबईकरांच्या आर्कषणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
स्वर्ण गणपती म्हणून नावलैकिक असणारा मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळापैकी एक मंडळ म्हणजे जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. वडाळा येथे या बाप्पाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठाना करण्यात येते. १९५४ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

अंधेरीचा राजा
कामगार वर्गांनी एकत्र येऊन या गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. मुंबईतील प्रमुख मंडळापैकी एक मंडळ असून याठिकाणी ही भाविकांसह सेलिब्रेटी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. अनंत चतुर्थीनंतर येणार्‍या संकष्ठीच्या दिवशी म्हणजे 21 दिवसांने येथील बाप्पाची विर्सजन मिरवणुक काढण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -