काशिमिरा येथील पत्रकार नित्यानंद पांडे यांची निर्घृण हत्या

नित्यानंद पांडे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या मागणीवरुन शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालया पाठवण्यात आला आहे.

Bhiwandi

काशिमिरा येथील पत्रकार नित्यानंद पांडे यांची हत्या करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. हत्या करुन त्यांचा मृतदेह तालुक्यातील भिवंडी-वसई रोड वरील खार्डी गावाच्या हद्दीत एका नाल्यात टाकून देण्यात आला होता. हा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे .काशीमिरा इथून प्रकाशित होणऱ्या इंडिया अनबाउंड या साप्ताहिक वृत्तपत्र आणि मासिक मॅक्झिनचे ते संपादक होते. त्यांची हत्या का आणि कोणी केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दोन दिवसानंतर सापडला मृतदेह

नित्यानंद पांडे हे १५ मार्चपासून बेपत्ता होते. ते बेपत्ता झाल्ययाची काशिमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, भिवंडी तालुका पोलीसांना खारबाव रोडवरील खार्डी या गावाच्या हद्दीत रस्त्यालगत एका खड्ड्यात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. हत्या करुन फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी ठाणे ग्रामीण क्षेत्रातील पोलीस ठाण्यात तपास सुरु केला. काशीमिरा येथील बेपत्ता व्यक्तिचे वर्णन मृतदेहाशी मिळते जुळते असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी नित्यानंद पांडे यांच्या कुटुंबियांना मृतदेहाच्या ओळखण्यासाठी बोलावले.

आरोपींचा शोध सुरु

नित्यानंद पांडे यांची हत्या डोक्यात तीन ते चार वार करुन करण्यात आली होती. दरम्यान, नित्यानंद पांडे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या मागणीवरुन शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालया पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, डिवायएसपी गोडबोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी आणि मृतदेह ठेवलेल्या स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात भेट देऊन हत्येमागील कारणांचा तपास सुरु केला. ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणांसाठी केली याचा तपास भिवंडी तालुका पोलीसांकडून सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here