घरमुंबईमेट्रोच्या प्रस्तावासाठी शिवसेनेकडून प्रशासनाची कोंडी

मेट्रोच्या प्रस्तावासाठी शिवसेनेकडून प्रशासनाची कोंडी

Subscribe

आरेतील मेट्रो प्रकल्प ३ साठी उभारण्यात येणार्‍या कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे कापण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या विरोधानंतही मंजूर करण्यात आल्यामुळे मेट्रोच्या प्रस्तावासाठी शिवसेनेने प्रशासनाला कोंडीत पकडले आहे.

मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पासाठी ‘आरे’तील झाडे कापण्याच्या प्रस्ताव विरोधानंतरही प्रशासनाने मंजूर केल्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आयुक्तांनी हा प्रस्ताव मंजूर केला असला तरी या मंजूर प्रस्तावाची प्रमाणित प्रत मात्र, शिवसेनेने रोखून धरली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या मंजूर प्रस्तावाची प्रमाणित प्रत देवू नये, असे पत्रच चिटणीस विभागाला दिले आहे. त्यामुळे आयुक्तांनीही ही प्रत देण्यासाठी चिटणीस यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. एकाबाजुला आयुक्त हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्याने त्यांना ही प्रमाणित प्रत देणे आवश्यक असले तरी विभागाचे प्रमुख म्हणून स्थायी समिती अध्यक्षांनीच ही प्रत देवू नये, म्हणून पत्र दिल्याने महापालिका चिटणीस कैचीत अडकले आहेत.

महापालिका चिटणीस विभागावर आयुक्तांचा दबाव

आरेतील मेट्रो प्रकल्प ३ साठी उभारण्यात येणार्‍या कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे कापण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या विरोधानंतही मंजूर करण्यात आला. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सभात्याग केल्याची संधी साधत भाजप आणि राष्ट्रवादी काँगेसच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी रस्त्यांवर उतरुन ‘सेव्ह आरे’च्या नावाने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमींची सहानभूती शिवसेना मिळत आहे. तसेच्या त्यांच्या आंदोलनाला शिवसेनेकडून पाठिंबा दिला जात आहे.

- Advertisement -

आयुक्तांनी खेळला रडीचा डाव

आयुक्तांनी रडीचा डाव खेळल्यामुळे आता शिवसेनेनेही त्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. एखादा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या मंजूर प्रस्तावाची प्रमाणित पत्र मिळाल्यानंतरच कार्यादेश दिला जातो. किंबहुना त्या आधारे कामाला सुरुवात केली जाते. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याची प्रमाणित पत्र, प्रशासनाला देण्यात येवू नये, असे पत्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे. मात्र, दुसरीकडे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी याची प्रमाणित प्रत मिळावी म्हणून चिटणीस यांना देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या वादात सध्या मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाची झाडे कापण्याची प्रमाणित प्रत अडकली आहे. परिणामी मेट्रो रेल्वेला कारशेडसाठी झाडे कापून प्रकल्प राबवण्यास विलंब होत आहे.

मंजूर प्रस्तावाची प्रमाणित प्रत ठेवली रोखून

समिती अध्यक्षांनी ही प्रमाणित प्रत देण्यापासून चिटणीस विभागाला रोखल्याने मंगळवारी प्रविणसिंह परदेशी यांनी चिटणीस प्रकाश जेकटे यांच्यासह सह आयुक्त आशुतोष सलिल आणि उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. तब्बल दोन ते तीन वेळा आयुक्तांनी चिटणीस यांना आपल्या दालनात बोलावून घेतले होते. परंतु, रात्री उशिरापर्यंत ही प्रमाणित प्रत देण्यात आली नव्हती. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड आणि सह आयुक्त चंद्रशेख चौरे यांनी थेट चिटणीस यांचे कार्यालय गाठत त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे यांच्या माध्यमातून आयुक्तांनी हा दबाव वाढवल्याचे दिसत होते. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण महापालिका चिटणीस यांना प्रमाणित प्रत देवू नये, असे पत्र दिल्याचे कबुल केले आहे. आयुक्तांनी खेळलेल्या रडीचा डावाबद्दल त्यांना धडा शिकवणार असा यशवंत जाधव निर्धार केला आहे.

- Advertisement -

झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणातील तज्ज्ञ मंडळींनी दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप केल्याने प्राधिकरणाचे सदस्य सुभाष पाटणे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एनसी स्वरुपात ही तक्रार दाखल केली आहे. या आरोपानंतर शशीरेखा सुरेशकुमार यांच्यासह चंद्रकांत साळुंखे यांनी आपल्या प्राधिकरणाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.


हेही वाचा – मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव फेटाळला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -