घरमुंबईशेतकर्‍यांचा महावितरणाला हायव्हॉल्टेज झटका

शेतकर्‍यांचा महावितरणाला हायव्हॉल्टेज झटका

Subscribe

अडीच लाखाची वीज जोडणी दिली, बदल्यात वीज बिले थकवली

व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस) योजनेच्या अंतर्गत महावितरणने प्रत्येक कृषीपंपाच्या जोडणीसाठी अडीच लाख रुपये खर्च केले. असे सुमारे १३ हजार शेतकर्‍यांना वीज जोडणी दिली. त्याकरता कोट्यवधींची गुंतवणूकही केली, मात्र त्यानंतर महावितरणने शेतकर्‍यांना वीज बिले पाठवली, परंतु शेतकर्‍यांनी बिनदिक्कतपणे वीज बिले थकवून महावितरण हायव्हॉल्टेज झटका दिला आहे.

एचव्हीडीएस योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सुमारे १.७५ लाख वीज जोडण्या देण्याचे उदिष्ट महावितरणकडून ठेवण्यात आले. या योजनेसाठी एकूण ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यापैकी २२०० कोटी रूपये हे राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर महावितरणने उर्वरीत २८०० कोटी रूपयांचे कर्ज काढले आहे. महावितरणने या योजनेअंतर्गत आतापर्यंत १३ हजार शेतकर्‍यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी दिली आहे. वीज जोडणी दिलेल्या शेतकर्‍यांना महावितरणने मार्च महिन्यापासून १ हजार ८९१ शेतकर्‍यांना वीजबिले पाठवली.

- Advertisement -

मात्र त्यांची अद्याप वसुली न झाल्याने ही थकबाकी ४६ लाख १५ हजार रूपयांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत महावितरणने दोन वेळा वीजबिले देऊ केली आहेत. पण या वीज ग्राहकांकडून थकबाकी भरली जात नसल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांपैकी कृषीपंप वीज ग्राहकांचा विजेचा वापर हा ३० टक्के इतका आहे. एचव्हीडीएस योजनेअंतर्गत महावितरणने एका ट्रान्सफॉर्मरवर दोन वीज जोडण्या मंजूर केल्या आहेत. सुमारे दीड लाख वीज ग्राहकांसाठी १ लाख २७ हजार ट्रान्सफॉर्मर महावितरणकडून खरेदी करण्यात येणार आहेत. अनेकदा एकाच ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा जास्त विजेचा भार आल्याने ते जळाल्याचे किंवा बिघडल्याचे प्रकार समोर आले होते.

वीज गळती कमी करतानाच आकड्याद्वारे होणारी विजेची चोरी कमी करण्यासाठी एचव्हीडीएस योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्यात येत आहे. शेतकर्‍यांचे शेतातील अपघात कमी व्हावेत यासाठी इन्सुलेटे वायरचा वापर, विजेचा भार वाढल्यास यंत्रणेचे नुकसान होऊ नये म्हणून एबी स्विचचा वापरही महाराष्ट्रातील वीज जोडणीसाठी करण्यात आला आहे. या वर्षअखेरीस ७५ हजार वीज जोडण्या देण्याचा महावितरणचा मानस आहे.

- Advertisement -

कुठे किती वीज जोडण्या ?
अकोला 798, अमरावती 574, यवतमाळ 846, भंडारा 551, परभणी 655, बारामती 1100, सातारा 693, नाशिक 714, गोंदिया 551, हिंगोली 454, जळगाव 514, लातुर 671, सांगली 538, कोल्हापुर 502, सोलापूर 503

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -