घरमुंबईजमिनीवरील दाव्यामुळे उल्हासनगरात वाद

जमिनीवरील दाव्यामुळे उल्हासनगरात वाद

Subscribe

येथील पूज्य धर्मवाडी पंचायत या धार्मिक संस्थेचा ताबा असलेली जमीन सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या जमीनीवर सध्या विद्यमान नगरसेवकाने दावा केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उल्हासनगर 3 येथील ओटी सेक्शन परिसरात जवळपास 1000 वर्ग मीटरच्या जागेवर मागील अनेक वर्षांपासून पूज्य धर्मवाडी पंचायत या धार्मिक संस्थेचा ताबा आहे. या जागेचा टॅक्ससुद्धा आम्ही भरत आहोत. शासनदेखील आमच्याशी शासकीय पत्रव्यवहार करीत असते, असा दावा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बाबू मंगलानी यांनी केला आहे. याठिकाणी संस्थेचा बोर्डदेखील लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाच्या कर्मचार्‍यांचे पथक हा बोर्ड काढण्यासाठी आले असता संस्थेच्या लोकांनी त्याला तीव्र विरोध केला. दुसरीकडे विद्यमान नगरसेवक टोनी शिरवानी यांनी ही जमीन स्व. बक्तराम पाहिलाजराय तलरेजा यांनी महाराष्ट्र शासनाकडून 1961 मध्ये विकत घेतली होती. त्यांची मुलगी नेहा आहुजा व अन्य वारसदार यांच्याशी कायदेशीर व्यवहार करूनच आपण जागा खरेदी केली, असा दावा केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे म्हणाले की, ‘सध्या ही जागा महाराष्ट्र शासनाची असल्याचे आमच्याकडे प्राथमिक पुरावे आहेत. दोन्ही पक्षांनी जागेवर दावा केला आहे. कागदपत्रेदेखील सादर केली आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -