या दिवशी होणार काँग्रेससाठी इच्छुकांच्या मुलाखती

विधानसभा निवडणूकांना काहीच महिन्यांचा अवधी शिल्लक असताना काँग्रेसतर्फे इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते.

Mumbai
Interviews of aspirants for Congress will be held on this day
काँग्रेस पक्ष

विधानसभा निवडणूकांना काहीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेस तर्फे इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार अनेक उमेदवारांचे अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर झाले आहेत. आता या अर्जदारांना मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवशी उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरात प्रचंड प्रतिसाद

मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे अर्ज केले आहेत. त्यानुसार दिनांक २९, ३० व ३१ जुलै रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.

हेही वाचा – नगरपालिका आणि मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुलाखतींचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार

प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक मुलाखती घेऊन आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.