घरमुंबईशिधापत्रिकेवर लोह आणि आयोडीनयुक्त मीठ होणार उपलब्ध

शिधापत्रिकेवर लोह आणि आयोडीनयुक्त मीठ होणार उपलब्ध

Subscribe

महिलांमधील अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्तभाव दुकानातून शिधापत्रिकेवर ‘लोह आणि आयोडिनयुक्त’ मीठ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आहाराची सकसता वाढविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांमधील अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्तभाव दुकानातून शिधापत्रिकेवर ‘लोह आणि आयोडिनयुक्त’ (डबल फोर्टीफाईड) मीठ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या होणार कार्यक्रमाचा शुभारंभ

या कार्यक्रमा अंतर्गत मुंबई येथे या मीठ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते आणि उद्योग आणि मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम चितपावन ब्राम्हण संघ सभागृह, सोवनी पथ, गिरगाव येथे पार पडणार आहेत. सध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू, तांदूळ आणि तूर डाळ देण्यात येत आहे.

- Advertisement -

दिवाळीसाठी विशेष सूट

सध्या दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना सूट देण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त साखर, उडीदडाळ आणि चणाडाळीवर विशेष सूट देण्यात आली आहे. शिधापत्रिकेवर प्रति कार्ड एक किलो २० रुपये या दराने साखर वाटप करण्यात येत आहे. तर, प्रति कार्ड एक किलो चणाडाळ आणि एक किलो उडीदडाळ देण्यात येत आहे. जर एखादी डाळ घ्यायची असल्यास ती दोन किलो देखील घेता येऊ शकणार आहे. दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ २ किलो प्रतिकिलो ३५ रुपये या दराने उपलब्ध होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -