मुंबईत जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग

जयपूर फॉस्ट एक्स्प्रेसला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Mumbai
jaipur express fare in mumbai central

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी जयपूर फॉस्ट एक्स्प्रेसला अचानक आग लागण्याची धक्कादायक घटना बुधवारी सांयकाळी मुंबई सेंट्रल येथे घडली. मात्र, सुदैवाने ही एक्स्प्रेस मुंबर्ई सेंट्रल यार्डात उभी असल्याने आणि रेल्वेचे डबे रिकामी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी घडली नाही. मात्र, अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मुंबई सेंट्रल येथे रेल्वेच्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या १२९५५ जयपूर एक्सप्रेसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास  घडली आहे. जयपुर ही एक्सप्रेस बुधवारी मुंबर्ई सेंट्रल यार्डात उभी होती. तेव्हा या गाडीच्या बी ३ या एसी थ्री टायरच्या कोचमधून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. धुर येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच या कोचला लागून असलेले इतर कोच  सुरक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. या घटनेमुळे गाडीच्या वेळेत बदल करुन गाडीला दुसरे कोच जोडून एक्स्प्रेस रवाना करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

चौकशीसाठी  समितीची स्थापना

मुंबई सेंट्रल यार्डामध्ये उभ्या असलेल्या जयपूर फॉस्ट एक्स्प्रेसच्या रिकाम्या कोचला नेमकी आग कशामुळे लागली? यांचा तपास करण्यासाठी पश्चिम रेल्वेने तातडीने एक उच्च स्तरिय समितीची स्थापना केली आहे. या समीतीत चार वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे. या समितीमध्ये सेफ्टी, सुरक्षा, मॅकेनिकल आणि ईलेक्ट्रिक विभागातील प्रत्येकी एक एक अधिकार्‍यांचा समावेश आहे. या आगीची सखोल चौकशी करून आपला अहवाल पश्चिम रेल्वेला देणार आहे. या  उच्च स्तरीय समितीच्या अहवालनंतरच या आगीचे कारण समजणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.