‘मुख्यमंत्र्यांच्या आंघोळीला उशीर होऊ नये; त्यासाठी पाण्याचे बिल मी भरणार’

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत पाण्याचे बिल मी स्वतः भरतो असे सांगत खिल्ली उडवली आहे.

Mumbai
photo of jitendra avhad
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे प्रातिनीधिक छायाचित्र

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’चे पाणी बिल न भरल्यामुळे मुंबई महापालिकेने या बंगल्याला डिफॉल्टर यादीत टाकल्याची माहिती समोर आल्याने विरोधकांच्या हातात ऐन अधिवेशनात आयते कोलीत मिळाले असून, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत पाण्याचे बिल मी स्वतः भरतो असे सांगत खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आंघोळीला उशीर होऊ नये म्हणून मी बिल भरतो असे आव्हाड म्हणालेत.

…म्हणून आव्हाड म्हणाले मी बिल भरतो 

मुख्यमंत्र्यांच्या घरी देश विदेशातून पाहुणे येत असतात. त्यामुळे हे पाहुणे आल्यावर पाण्याची कपात होऊ नये. तसेच मुख्यमंत्री नेहमी व्यस्त असतात त्यामुळे पाणी कपात होऊन आंघोळीला आणि तोंड धुवायला उशीर होऊ नये म्हणून मी बिल भरायला तयार आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच जर राज्य सरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात येणाऱ्या पाण्याचे बिल भरण्याचे पैसे नसतील तर राज्यातील जनतेचं काय? असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाने साडेसात लाखांचे पाणी बिल थकवल्याचं माहिती अधिकारात उघड झालं असून, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांना ही माहिती मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांनीच पाणी बिल थकवले नसून, इतर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांची ८ पाणी बिले थकली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here