व्यसनमुक्तीसाठी सायकलवरून भारतवारी; १८ हजार किलोमीटरचा केला प्रवास!

सध्याची तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चालली आहे. त्यामुळे पंजाब राज्यातील कुलदीपसिंग राठोड यांनी व्यसनमुक्तीसाठी सायकलवरून भारत भ्रमण यात्रा करत आहे.

Thane
kuldeep singh rathore travel to india by bicycle for addiction free india

सध्याची युवा पिढी नशेच्या आहारी गेली असून दिवसेंदिवस अनेक प्रकारच्या व्यसनाकडे तरुण वर्ग वळत आहे. या व्यसनातून तरुण पिढी बाहेर निघावी तसेच ग्रासलेल्या तरुण पिढीला चांगला मार्ग दाखवण्याकरिता पंजाब राज्यातील कुलदीपसिंग राठोड यांनी भारतभ्रमण यात्रा सुरू केली आहे. पंजाब मधून निघालेल्या राठोड यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्र करत तब्बल आतापर्यंत १८ हजार ९४० किलोमीटरचा बॅटरीवर चालणाऱ्या सायकलच्या माध्यमातून प्रवास करत ठाणे शहरात दाखल झाले.

जाणून घ्या या व्यक्तीविषयी….

भारतातली अनेक सुशिक्षित तरुण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून येणारी पिढी व्यसनमुक्त असावी यासाठी कुलदिपसिंग यांनी १ एप्रिलपासून ही भारतभ्रमण यात्रा सुरू केली आहे. कुलदीपसिंग यांचा जन्म गुजरातमधील भावनगर येथील राठोड कुटुंब राजपूत असून देखील त्यांचे वडील कर्तारसिंग यांनी शिख धर्माचे आचरण करण्यास सुरुवात केली. पुढे नोकरी व्यवसायानिमित्त सर्व कुटुंब पंजाबमध्ये स्थायिक झाले. ५२ वर्षीय कुलदीप सिंग यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेऊन लुधियाना येथील सायकल कंपनीत चिफ अकाऊंटंट म्हणून काम केले आहे. ते दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. कुलदीप सिंग यांनी याआधी २०११ मध्ये अपंगाच्या न्याय हक्कासाठी सायकल वारी करीत भारतभ्रमण करून अनोखा संदेश दिला होता. १ एप्रिल २०१९ पासून त्यांनी पुन्हा भारतभ्रमण करण्याचे ठरवले. दररोज १५० ते २०० किलोमीटरचा प्रवास चार्जिंगवर चालणाऱ्या सायकलवरून करून व्यसनाधीन तरुणांमध्ये जनजागृती करीत आहेत. त्यांना एक मुलगी असून ती एमबीबीएस पदवीधर आहे. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी असलेल्या टपऱ्यांवर थांबून तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत.

तरुणांनीही व्यसने सोडून सुदृढ शरीराकडे लक्ष द्यावे

व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन मी सध्या भारतभर फिरतो आहे. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करतो आहे. तरुणांनीही व्यसने सोडून सुदृढ शरीराकडे लक्ष द्यावे, असे माझे सांगणे आहे. भारतात आजही अखंडता, एकता टिकून असल्याने मला माझ्या भारत देशाचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया कुलदीपसिंग राठोड यांनी व्यक्त केली.


हेही वाचा – ड्रायव्हिंगसाठी मुंबई जगातलं सर्वात वाईट शहर!