घरमुंबईसुट्या सिगारेट, विडीच्या विक्रीवर बंदी

सुट्या सिगारेट, विडीच्या विक्रीवर बंदी

Subscribe

देशात बंदी आणणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य

सुट्या सिगारेट आणि विडीवर बंदी आणणार महाराष्ट्र हे देशात पहिल राज्य ठरले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतचे एक परिपत्रक शनिवारी जारी केले आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक राज्यात लागू झाले आहे. त्यानुसार आता सुट्या सिगारेट विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. सुट्या सिगारेट या पाकिटाशिवाय विकण्यात येत असल्याचे आढळून आल्यानेच हे परिपत्रक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे. पाकिटात सिगारेट विक्री होत असल्याने सिगारेटमुळे आरोग्यावर होणारा इशारा आणि सिगारेटचे आरोग्यावर होणारे परिणाम या गोष्टी ती ओढणाऱ्याला जाणीव करून देता येत नाही.

tobaco

- Advertisement -

सिगारेटमुळे कर्करोग आणि ह्दयविकार यासारख्या आजाराबाबत जनजागृती घडवण्यासाठीच हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. नव्या आदेशामुळे तरूणांमध्ये सिगारेट ओढण्याचे व्यसन कमी होण्यासाठी मदत होईल. सरासरी १६ ते १७ वयोगटादरम्यान सध्या सिगारेट ओढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तरूणांना एक सिगारेट खरेदी करता येते, पण संपुर्ण सिगारेटचे पाकिट खरेदी करून ती ओढणे शक्य नसते. त्यामुळेच सिगारेटवर जास्त कर लावूनही त्याची झळ ही सुट्या पद्धतीने विकत घेणाऱ्यांना जाणवत नसते. म्हणूनच सिगारेट सुटी विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार आणि सर्वेक्षणानुसार अशी माहिती समोर आली आहे की, जेव्हा तंबाखू उत्पादनावर करामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तेव्हा सिगारेट ओढणाऱ्यांचा टक्का हा ८ टक्क्यांनी घसरला आहे. पण जेव्हा सुटी सिगारेट विकण्यात येते तेव्हा मात्र या कराचा फारसा बोजा ती खरेदी करणाऱ्यांवर येताना दिसत नाही. म्हणूनच सिगारेटची सुट्या विक्रीवर चाप बसावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. देशात महाराष्ट्रात सिगारटे ओढणाऱ्यांचा टक्का हा इतर मेट्रो आणि मोठ्या शहराच्या तुलनेत कमी आहे.

- Advertisement -

कोणत्या कायद्यान्वये ही बंदी ?
Prohibition of Advertisement and Regulation of Trade and commerce Production, Supply & Distribution Act 2003 या कायद्यातील कलम २ अनुच्छेद ७ नुसार तंबाखू उत्पादनावर ही बंदी घालण्यात आली आहे. या कायद्यान्वये राज्य सरकारला सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर पुर्णपणे बंदी घालण्याचा अधिकार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -