घरमुंबईमुंब्य्रात साकारले महाराष्ट्र शिल्प

मुंब्य्रात साकारले महाराष्ट्र शिल्प

Subscribe

खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य महाराष्ट्र चित्रशिल्पाचे अनावरण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. जगतगुरु तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे. यावेळी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, मनोहर साळवी, महेश साळवी, नगरसेवक अश्रफ पठाण, नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते मनिषा साळवी, आरती गायकवाड, रुपाली गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून रेतीबंदर चौपाटीचे सुशोभीकरण होत असताना आयुक्त आणि सत्ताधारी पक्षातील नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.

ठाणे, कळवा, मुंब्रावासियांसाठी रेतीबंदर येथे महानगरपालिकेच्यावतीने चौपाटी निर्माण करण्यात आली आहे. दलदल आणि अनधिकृत बांधकामांनी वेढलेल्या रेतीबंदरचा सुयोनियोजित पद्धतीने विकास होत आहे. याच ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखविणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प साकार करण्यात आले आहे. महाराष्ट्र माझा असे नाव असलेल्या या भित्तीचित्रशिल्पाची निर्मिती प्रथमच मुंब्रा रेतीबंदर येथे करण्यात आलेली आहे. चित्रशिल्पकार केदार घाटे यांनी या चित्रशिल्पाची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

चित्रशिल्पाच्या अनावरणानंतर बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, हे चित्रशिल्प पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेचा संदेश प्रसारीत करणारे आहे. आभूषणे आणि शस्त्रांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांकडून स्वराज्य चालविण्याचे धडे घेत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींनी जे राज्य स्थापन केले ते भोसल्यांचे नव्हते तर ते स्वराज्य होते. आठरापगड जातींना सामावून घेऊन समता आणि समानतेचे राज्य त्यांनी स्थापन केले होते. महात्मा फुलेंनी त्याच शिवाजी महाराजांची समाधी शोधून समतेच्या विचारांचा प्रचार केला होता. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी शिवराय-फुलेंच्या समानतेच्या विचारांचा विद्रोह जागवला होता. हे या चित्रशिल्पांच्या माध्यमातून दाखविले असतानाच या शिल्पात दोन स्त्रियांना वरचे स्थान दिले आहे. या दोन स्त्रिया म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले ! असे विचार कोल्हे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -