घरमुंबई'त्या' स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी करण्यात आली', कारण...

‘त्या’ स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी करण्यात आली’, कारण…

Subscribe

एखाद्या व्यक्तीने जगाचा निरोप घेतला की स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे, स्मशानभूमी म्हणजे निवर्तलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचं ठिकाण. आजवर स्मशानभूमीमध्ये केवळ उत्तरक्रिया केल्याचं सगळयांनी पाहिलं आहे. पण याच स्मशानभूमीमध्ये कोणी महाशिवरात्र साजरी केल्याचं ऐकिवात नाही किंवा कोणी पाहिलंही नाही. परंतु, भोईवाडामध्ये स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी करण्यात आली आहे. ज्या भोईवाडा स्मशानभूमीत नेहमी लोक अंत्ययात्रेसाठी जात असतात त्याच स्मशानभूमीत आज लोक शंकराचं दर्शन घेण्यासाठी जाताना पाहायला मिळत होते.

म्हणून स्मशानभूमीत साजरी झाली महाशिवरात्र!

मुंबईमधील भोईवाडा येथे असलेल्या स्मशानभूमीत गेल्या कित्येक वर्षांपासून शंकराचं मंदिर आहे. या मंदिरात दररोज पूजाअर्चा होते. परंतु पहिल्यांदाच येथे महाशिवरात्र साजरी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीत शंकराचं मंदिर आहे. मात्र, येथे देवाचा वास असल्यामुळे आपल्याकडून त्याची सेवा व्हावी या हेतूने आम्ही स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी करण्याचा निर्णय घेतला, असं आयोजक संकेत बावकर यांनी संगितलं. दरम्यान, पाहिल्यांदाच स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी होत असताना येथील नागरिकांनीही या उपक्रमाला सकारत्मक प्रतिसाद दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -