घरमुंबईमहापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या जामनगरमधून ताब्यात घेतले आहे.

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या जामनगरमधून ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी त्याला मुंबईत आणणार आहे. तपास अधिकारी उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनोज दोढीया असून तो २० वर्षांचा आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या कार्यालयात फोन करून किशोरी पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. २१ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास धमकीचा फोन आला. याबाबतची तक्रार दोन दिवसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४, ५०६ (२), ५०७, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला होता. आता धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या जामनगरमधून ताब्यात घेतले आहे. किशोरी पेडणेकर यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -