घरमुंबईकिशोरी पेडणेकर यांनी महापौरपद सोडावे - किरीट सोमय्या

किशोरी पेडणेकर यांनी महापौरपद सोडावे – किरीट सोमय्या

Subscribe

वरळी एसआरए प्रकरण, महापौरांची चौकशी व्हायलाच हवी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अर्धा डझन इतक्या मोठ्या प्रमाणात वरळीतील झोपडीवासीयांची घरे हडप केल्याचा आरोपा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. अशी घोटाळे करणारी व्यक्ती महापौर पदासारख्या सर्वोच्च स्थानावर राहू शकत नाही. म्हणूनच या संपुर्ण घोट्याळाची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

वरळीतील गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील ही सहा घरे आहेत. किशोरी पेडणेकर यांनी वरळीतील या घरांना निवासस्थान म्हणून दाखवले आहे. तर कुटुंबातील व्यक्तींच्या कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय दाखवले आहे. अलिकडेच उभे करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरच्या कंत्राटासाठीही याच पत्त्याचा आधार महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे. मुंबईतला प्रथम नागरिक म्हणून महापौर हे सर्वोच्च स्थान आहे. या पदावरून त्यांनी बाजूला व्हावे. तसेच या संपुर्ण प्रकरणाची चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फतही याआधी कोव्हिड सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

- Advertisement -

जम्बो कोविड सेंटर घोटाळा असल्याची टीका करत याआधीही महापौरांवर मुंबई महापालिकेत अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात आला होता. त्यामध्ये बीकेसी, मुलुंड, दहिसर, वरळी (एन.एस.सी.आय), नेस्को, भायखळा रिचर्डसन क्रुडास, वरळी रेसकोर्स येथे उभारणी, साहित्य, उपकरणे खरेदी, प्रचालन कंत्राट व मनुष्यबळ पुरवठा आदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

वरळी भागातील कोविड सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करून देण्यात आला असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. याबाबतची कागदपत्रेही त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली होती. फक्त वरळी नव्हे तर मुंबईतील अन्य भागातही अशाप्रकारे महापौरांच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला होता.महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट देण्यात आले, असे ते म्हणाले. कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात असाही आरोप मनसेकडून करण्यात आला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -