घरमुंबईकॉमन मोबिलिटी कार्ड योजनेत मेट्रो ३चा समावेश

कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेत मेट्रो ३चा समावेश

Subscribe

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) मार्फत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व स्थानकांमध्ये स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा उभारण्यासाठी कालिंदि-एसिस समुहाची नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे जायकाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एमएमआरडीए राबवित असलेल्या “कॉमन मॉबिलिटी कार्ड” ला मेट्रो-३ची ही स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा पूरक ठरणार आहे.

- Advertisement -

सदर कंत्राटदार मेट्रो-३ च्या २७ स्थानकांच्या स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणेचे आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना,चाचणी आणि कमिशनिंगचे काम करणार आहेत. स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा ही मेट्रो-३ साठी अत्यंत महत्वाची असून त्यामुळे प्रवाशांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. अशा यंत्रणांमुळे प्रवाशांच्या वेळेची बचतही होणार आहे अशी प्रतिक्रिया एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.

मेट्रो-३ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी एकात्मिक तिकीट आकारणी यंत्रणा ( आयटीएस) प्रस्तावित केलेली आहे. त्यासाठी एमएमआरडीए राबवित असलेल्या “कॉमन मॉबिलिटी कार्ड” ला मेट्रो-३ची स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा पूरक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -