घरताज्या घडामोडीम्हाडा करणार कामाठीपुराचा समूह पुनर्विकास - जितेंद्र आव्हाड

म्हाडा करणार कामाठीपुराचा समूह पुनर्विकास – जितेंद्र आव्हाड

Subscribe

‘म्हाडा’च्या माध्यमातून विकास आराखडा

‘म्हाडा’च्या माध्यमातून कामाठीपुराचा समूह पुनर्विकास केला जाईल. लवकरच कामाठीपुराचा विकास आराखडा तयार करण्यात येईल अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच दिली. मुंबईतील कामाठीपुरा भागाच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने कामाठीपुरा येथे मंत्री आव्हाड यांनी प्रत्यक्ष भेट देवून प्रकल्पाची स्थळ पाहणी केली व स्थानिक रहिवाशांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते.

आम्ही कामाठीपुरामध्ये एक सकारात्मक भूमिका घेऊन आलो आहोत. कामाठीपुरा हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून त्यालगतच ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जेजे हॉस्पिटल, ग्रँट रोड स्टेशन यासारखे महत्त्वाचे भाग आहेत. कामाठीपुराचा विकास करून तेथे सर्वात मोठे व्यापारी केंद्र उभे करता येईल. यापुढे ‘म्हाडा’चे जे मोठमोठे प्रकल्प आराखडे राहतील, त्यामध्ये म्हाडाची संयुक्त भागीदारी असेल. म्हाडाने सर्व जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. ‘म्हाडा’च्या एका घरासाठी आज दोनशे लोक अर्ज करतात तर दुसरीकडे विकासकाला त्याचे एक घर विकण्यासाठी अनेकांकडे जावे लागत आहे. यावरून लोकांचा म्हाडा व आणि शासनावरील विश्वास दिसून येतो. कामाठीपुराचा विकास करताना येथील स्थानिक लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कुठलीही भीती बाळगू नका, विश्वास बाळगा, असेही आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisement -

तत्पूर्वी मंत्री आव्हाड यांनी संपूर्ण कामाठीपुरा परिसराची पाहणी केली. स्थानिक लोकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मंत्री आव्हाड यांच्यासोबत गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.


हे ही वाचा – दिल्ली ते मुंबई हायपरलूप ट्रान्सपोर्टचा प्रस्ताव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -