घरमुंबईठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे धरणे आंदोलन

ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे धरणे आंदोलन

Subscribe

ठाणेकरांची टोलमुक्तीतून लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी मनसेकडून केली जातो आहे.

मनसेकडून एच एच ०४ या क्रमांकाच्या वाहनांकडून टोल आकारणी करू नये या मागणीसाठी मंगळवारी आनंदनगर टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. ठाणेकरांची टोल मुक्तीतून लवकरात लवकर सुटका करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच मनसेने मानवी साखळी करून आंदोलन केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे टोल मुक्तीसाठी नवे ठाकरे सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष वेधले आहे.

रोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर खूपच त्रस्त

ठाण्यातून मुलुंडच्या हद्दीत जाण्यासाठी ठाणेकरांना टोल भरावा लागत असल्याने हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी टोल मुक्ती व्हावी, अशी मनसेची मागणी आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एच एच ०४ या क्रमांकाच्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. पण अजूनही टोल वसुली सुरूच आहे. पहिल्या टप्यात मनसेने आनंदनगर टोल नाका ते कोपरी ब्रीजपर्यंत मानवी साखळी करून आंदोलन केले होते. अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा पाऊण तासाचा खोळंबा सहन करावा लागतो. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर खूपच त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

मनसेने आंदोलन छेडण्याचा दिला इशारा 

मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात धरणे आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. रस्ते खड्ड्यात गेले असताना कसली टोल वसुली करता, असा सवालही मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत ठाणेकरांची टोल मुक्तीतून सुटका होत नाही तोपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.


हेही वाचा – जुगार खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांना महावितरणचा शॉक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -