घरमुंबईराहणारे इराणचे आणि मोबाईल चोरला मुंबईत, सीसीटीव्हीमुळे फसले!

राहणारे इराणचे आणि मोबाईल चोरला मुंबईत, सीसीटीव्हीमुळे फसले!

Subscribe

मंगळवारी मुलुंड पूर्व भागामध्ये हा सगळा प्रकार घडला होता. चोरट्यांनी दुकानदाराला चुना लावत महागाचा मोबाईल पळवला होता. मात्र, हा सगळा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या ३६ तासांमध्ये नवघर पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत या भुरट्या चोरांना अटक केली आहे.

मोबाईलच्या दुकानात ऐन गर्दीच्या वेळी दुकानदाराला अजिबात कळू न देता काऊंटरवर ठेवलेला मोबाईळ हातोहात लंपास करणाऱ्या एका टोळक्याला नवघर पोलिसांनी माहीम परिसरातून अटक केली आहे. मंगळवारी मुलुंड पूर्व भागामध्ये हा सगळा प्रकार घडला होता. चोरट्यांनी दुकानदाराला चुना लावत महागाचा मोबाईल पळवला होता. मात्र, हा सगळा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या ३६ तासांमध्ये नवघर पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत या भुरट्या चोरांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे तिघेही चोर भारतीय नसून इराणी नागरिक आहेत. मोहम्मद खानबक्ष(५३), लैला जाफरी(३७) आणि जाहिरा जाफरी(२४) अशी या तिघांची नावे आहेत.

कशी झाली चोरी?

मुलुंड पूर्वेकडे असलेल्या फडके रोडवरच्या ‘नील टेलिकॉम’ या दुकानात हा प्रकार घडला होता. मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी हे तिघे चोर दुकानात परदेशी नागरिक असल्याचं सांगून घुसले. यातल्या मोहम्मद खानबक्षने परदेशी चलन आपल्याकडे असल्याचं दुकानाचे मालक लोहार आणि त्यांच्या कामगाराला सांगितलं आणि त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवलं. ही संधी साधून लैला आणि जाहिरा या दोघींपैकी एकीने काऊंटरवरच ठेवलेला मोबाईल अलगदपणे आणि कुणाच्याही नकळत उचलून आपल्या बॅगेत घातला. आणि नंतर काहीतरी कारण सांगून हे तिघेही तिथून पसार झाले.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – चोरट्याने मोबाईल हिसकावला; प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू


सोशल मीडियामुळे सापडले भामटे!

दरम्यान, दुकानाचे मालक लोहार यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज थेट सोशल मीडियावर व्हायरल केले. याचा चांगलाच फायदा पोलिसांना झाला. सोशल मीडियावर हे फुटेज पाहून अशी तीन माणसं माहीम येथे राहात असल्याची माहीत कुणीतरी पोलिसांना पुरवली. हाच धागा पकडत नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी त्वरीत हालचाल करत माहिती मिळालेल्या ठिकाणी धाड टाकली आणि या तिघा भामट्यांना माहीम परिसरातून अटक केली.

- Advertisement -

उपचाराचं कारण देऊन घुसले होते मुंबईत

मोहम्मद, लैला आणि जाहिरा हे तिघे इराणचे रहिवासी आहेत. एका लहान मुलीच्या उपचारांचं कारण देऊन ते तिघे वैद्यकीय व्हिसावर मुंबईत आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते माहिममध्येच वास्तव्य करून होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -