घरमुंबईसमृद्धी महामार्गालगत १९ नवीन नगर उभारण्यात येणार

समृद्धी महामार्गालगत १९ नवीन नगर उभारण्यात येणार

Subscribe

आठ नगरांचा विकास आराखडा तयार

समृद्धी महामार्गालगत एकुण १९ नवीन नगरांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यापैकी ८ नवीन नगरांचा विकास आराखडा तयार आहे अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. प्रत्येकी १ लाख लोकसंख्या क्षमता असलेली ही नवीन नगरे असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एकुण ८ पैकी ६ नवीन नगरांची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ही पुढील वर्षी जूनमध्ये होईल असे त्यांनी सांगितले. साधारणपणे एक लाख क्षमतेची ही नवीन नगरांची रचना असेल. त्यामध्ये विविध प्रकारच्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या २० वर्षांमध्ये याठिकाणी लोकसंख्या विस्तार होईल. सुरूवातीला जमीन ताब्यात घेऊन सरकारी कार्यालयांची उभारणी करण्यात येईल. तसेच विविध उद्योग याठिकाणी येतील याची खबरदारी घेण्यात येणार आहेत.

- Advertisement -

इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा

समृद्धी महामार्गावर दर ४० ते ५० किमी मार्गावर दोन्ही बाजूला वेसाइड ऍमेनिटीजची उभारणी करण्यात येणार
असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रत्येक ठिकाणी विजेवर चालणा-या वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा
उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे श्री. मोपलवार म्हणाले. तसेच महामार्गावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट
सिस्टीम (आयटीएमएस) ही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून वाहनांचा वेग,
लेन कटिंग, वाहन ब्रेकडाऊन होणे इत्यादींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -