घरमुंबईमुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल

मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल

Subscribe

क्यूएस रँकिंग जाहीर; पारंपारिक विद्यापीठाच्या यादीत देशात चौथ्या स्थानी

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल क्रमांक पटकावला तर मुंबई विद्यापीठाने राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. क्यूएस रँकींगमध्ये जगामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 200 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या क्रमवारीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

आयआयटी मुंबई गतवर्षी 179 क्रमांकावर होती. यावर्षी त्यात वाढ होऊन ते 162 क्रमांकावर पोहचले आहे. त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 170 वा तर आयआयटी दिल्लीने 172 वा क्रमांक पटकावला. क्यूएस वर्ल्ड रॅकिंगमध्ये आयआयटी मुंबई ही देशातून अव्वल ठरली असताना मुंबई विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. तर राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे. क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे. क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने पाच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

- Advertisement -

खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे. पाच वर्षात विद्यापीठात 104 टक्क्यांनी पदवी आणि 112 टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर दूरस्थ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 147 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मध्ये 156 टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाली आहे. क्यूएस रॅकिंगमध्ये जगातील पहिल्या 10 इन्स्टिट्यूटमध्ये पाच इन्स्टिट्यूट या अमेरिका, चार इंग्लंड, तर एक झुरिकमधील आहे.

विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि शाश्वत प्रयत्नांची ही फळनिष्पती आहे. या निकालाचे समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, प्राखुख्याने विद्यापीठ कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, केमिकल टेक्नोलॉजीच्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्र करत आहे. विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ हे समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे.
– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -