घरमुंबईमरेची यंदा स्पेशल ट्रेन सुसाट...

मरेची यंदा स्पेशल ट्रेन सुसाट…

Subscribe

एप्रिल ते डिसेंबर १९ दरम्यान १,१८६ स्पेशल ट्रेन

 मध्य रेल्वेकडून उत्सव, सण, उन्हाळी-हिवाळी सुट्टीसाठी प्रवाशांच्या सुविधेसाठी तसेच पर्यटकांच्या सोयीकरिता स्पेशल ट्रेन चालविण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतोच, शिवाय रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढते. मध्य रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये अशा प्रकारे तब्बल १,१८६ स्पेशल ट्रेन चालविल्या.

रेल्वेतर्फे विविध मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्यात येतात. मध्य रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यान ९३२ स्पेशल ट्रेन चालविल्या होत्या. त्यामध्ये वाढ करुन २०१९ मध्ये १,१८६ स्पेशल ट्रेन चालविल्या. २०१८ च्या तुलनेत २०१९मध्ये २५४ जादा स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या.

- Advertisement -

उन्हाळी सुट्टी दरम्यान ५४०, गणपती उत्सवामध्ये १८६, दसरा-दिवाळी दरम्यान १३७, नाताळ-हिवाळी सुट्टीकरिता १६६ स्पेशल ट्रेन विविध मार्गावर चालविल्या. याशिवाय आषाढी एकादशी, वेलंकणी उत्सव, धम्मचक्र परिवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिनानिमित्त १५७ स्पेशल ट्रेन धावल्या. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये स्पेशल ट्रेनची संख्या वाढलेली आहे.

स्पेशल ट्रेनची आकडेवारी
सण २०१८ २०१९ वाढ
उन्हाळी स्पेशल ट्रेन ५०५ ५४० ६.९३ टक्केे
गणपती स्पेशल ट्रेन १६० १८६ १६.२६ टक्के
दसरा-दिवाळी स्पेशल ट्रेन ७६ १३७ ८०.२६ टक्के
नाताळ-हिवाळी सुट्टी ४९ १६६ २३८ टक्के
आषाढी, वेलंकणी व इतर १४२ १५७ १०.५६ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -