घरताज्या घडामोडीसंगीत शिक्षक विनयभंग करायचा; पीडिते मुलीनं मोठी झाल्यावर केलं हे धाडस

संगीत शिक्षक विनयभंग करायचा; पीडिते मुलीनं मोठी झाल्यावर केलं हे धाडस

Subscribe

महिला अत्याचाराच्या घटना देशभरात रोज घडत आहेत. मुंबई सारख्या महानगरात देखील महिला, अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. मात्र मुंबईतील एक अजब घटना समोर आली आहे. एक गिटार शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करायचा. २००७ ते २०१० या काळात विनयभंग केल्याप्रकरणी ५५ वर्षीय भरत पांचाळ उर्फ राजू या गिटार शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीने तब्बल दहा वर्षांनंतर आरोप दाखल करण्याची हिमंत दाखवली आहे. अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि अश्लिल भाषेचा वापर केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे.

आरोपी शिक्षक भरत पांचाळ हा अंधेरी येथील रहिवासी आहे. गिटार शिक्षक म्हणून तो विद्यार्थ्यांना गिटार शिकवायचा. पीडित मुलगी २००७ साली नऊ वर्षांची असताना आरोपीकडे गिटार शिकण्यासाठी गेली होती. यावेळी हा गिटार शिक्षक विद्यार्थिनीची छेडछाड करायचा तसेच अश्लिल भाषेचा बोलायचा. २००७ ते २०१० असे तीन वर्ष आरोपीने मुलीचा छळ केला. २०१० साली पीडित मुलगी १२ वर्षांची असताना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. सध्या ती अमेरिकेतून मुंबईत आलेली आहे. मुंबईत परतल्यानंतर या तरुणीने आरोपी शिक्षकाविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हे वाचा – कोरोनाचे चीनमध्ये थैमान; भारताला मात्र होणार फायदा

आरोपी भरत पांचाळ विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३५४ आणि कलम ५०९ अंर्तगत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पीडिता १० वर्षानंतर तक्रार दाखल करत आहे. आरोपीनं इतर विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे का? याचा तपास पोलीस करत आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. हिंगणघाट सारखे जळीतकांड असो किंवा बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना असो. महिलांवरील गुन्हे रोज घडत आहेत. यातच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. अनेक गुन्ह्यामध्ये सामाजिक दबाव असल्याकारणाने कुणी तक्रार करत नाही. मात्र मुंबईत संगीत शिक्षकावर १० वर्षांनी अल्पवयीन मुलगी मोठी झाल्यानंतर तिने भारतात येऊन तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -