राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; माढ्याच्या जागेवर चर्चा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.

Mumbai
NCP's meeting
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. माढ्याच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठक बोलावण्यात आली आहे. माढ्यामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यावर या बैठकीत चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीस उदयनराजे भोसले, बाळासाहेब पाटील, शंशिकात शिंदे, मकरंद पाटील, शिवेद्रंसिह राजे भोसले उपस्थित आहेत. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी या बैठकिला अनुपस्थिती लावली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here