घरमुंबई'बेरोजगारी'च्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आंदोलन!

‘बेरोजगारी’च्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आंदोलन!

Subscribe

'तरुणांना रोजगार मिळाला नाही तर देशात उद्रेक होईल आणि याला मोदी जबाबदार असतील,' अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशामध्ये ‘बेरोजगारी’ वाढली असल्याची टीका विरोधी पक्षांनी आजवर अनेकदा केली आहे. याच मुद्द्यावरुन आज ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी २ कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे ६.६० कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे मोदींना जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं’ राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांकनी सांगितले. शेकडो तरुणांनी रोजगार मिळावा, यासाठी आज ठाण्यातील दमाणी इस्टेट पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये अनोख्या पद्धतीने हे आंदोलन केले गेले. काही विद्यार्थ्यांनी आणि तरूणांनी एकत्र येत आपला बायोडेटा पंतप्रधान मोदी यांना स्पीड पोस्टद्वारे पाठवला. मागील ५ वर्षांत नोकरीसाठी एकही कॉल आला नसल्याचे या तरूणांचं म्हणणं आहे.

हे अनोखं आंदोलन ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी नोकरीचा अर्ज घेऊन जमलेल्या तरूणांनी मोदांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. ‘तरुणांना रोजगार मिळाला नाही तर देशात उद्रेक होईल आणि याला मोदी जबाबदार असतील,’ अशी टीका आव्हाड यांनी यावेळी केली.


धक्कादायक रिपोर्ट : मुंबईतला मराठी माणूस हरवतोय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -