घरताज्या घडामोडीशिवसेनेत दाखल झालेल्या भाजपच्या ४ नगरसेवकांचा अखेर राजीनामा!

शिवसेनेत दाखल झालेल्या भाजपच्या ४ नगरसेवकांचा अखेर राजीनामा!

Subscribe

भाजप पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या तुर्भे विभागातील ४ नगरसेवकांनी अखेर आज राजीनामा दिला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये तुर्भे प्रभाग ६८ चे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी, प्रभाग ७३ मधील नगरसेविका राधा कुलकर्णी, प्रभाग ६९ मधील नगरसेविका संगिता वास्के, प्रभाग ७० मधील नगरसेविका मुद्रिका गवळी यांचा समावेश आहे. आयुक्तांकडे राजीनामा सुपूर्द करताना शिवसेनेचे नेते तथा महापालिका विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी सोडून आमदार गणेश नाईक यांच्या सोबत सदर चार नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, भाजपात गेल्याने सदर नगरसेवकांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यामुळे या चार नगरसेवकांचे नेतृत्व करणारे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपकडून स्वबळाचा नारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -