घरमुंबईओमी कलानीचा गुन्हेगारी संपविण्याचा नारा

ओमी कलानीचा गुन्हेगारी संपविण्याचा नारा

Subscribe

उल्हासनगरच्या राजकारणात दबदबा असलेल्या पप्पू कलानी यांच्यानंतर राजकारणाची धुरा त्यांचा मुलगा ओमी कलानी सांभाळत आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या ओमी कलानी याने स्वत:चा पक्ष स्थापन करुन आता गुन्हेगारी संपवण्याचा नारा दिला आहे.

कधी कधी अट्टल गुन्हेगारच एकदम साधेसुधे वागायचा प्रयत्न करु लागतात पण लोकांना त्यावर विश्वास ठेवणे जड जाते. उल्हासनगरमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या ओमी कलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी “क्रिमनल हो गये अपग्रेड, हमे रहना पडेगा अपटेड” या टॅग लाईननुसार “सुरक्षित उल्हासनगर” ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार रविवारी सांयकाळी आमदार ज्योती कलानी यांच्याहस्ते नेहरु चौकात उद्घाटन करण्यात आले. उल्हानगरचे कुप्रसिद्ध माजी आमदार पप्पु कलानी हे सध्या एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात सजा भोगत आहे.

स्वत:च्या नावाने पक्षही स्थापन केला

उल्हासनगरच्या राजकारणात दबदबा असलेल्या पप्पू कलानी यांच्यानंतर राजकारणाची धुरा त्यांचा मुलगा ओमी कलानी सांभाळत आहे. त्यांनी स्वतःचा ‘टीम ओमी कलानी’ नावाचा पक्षही स्थापन केला आहे. स्वतः नगरसेवक म्हणून निवडून देखील आले. मात्र त्यांना तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले. राजकारणात सतत चर्चेत राहण्यासाठी पप्पू कलानी हे नवीन नवीन क्लुप्त्या शोधून काढत असतात. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एक मोहीम उघडून बॅनरबाजी आणि पत्रकबाजी केली, मात्र शहरात भ्रष्टाचाराचे प्रमाण कुठेही कमी झाले नाही अथवा कलानी आणि त्यांच्या साथीदारांनी भ्रष्टाचाराचे एखादे प्रकरण उघडकीस आणले, असेही घडले नाही. उलट पप्पू कलानी यांचीच रवानगी तुरुंगात झाली. यानंतर ओमी कलानी आणि त्यांच्या साथीदारांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली आणि भाजपसोबत युती केली. इथेही ओमी कलानी यांचे राजकिय अस्तित्व धोक्यात आल्यानंतर त्यांनी चर्चेत राहण्यासाठी नवीन क्लूप्ती शोधून काढली आहे . “सुरक्षित उल्हासनगर” नावाची मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओमी आणि त्यांची टीम वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणार आहे. “क्रिमिनल हो गये है अपग्रेड, तो हमे भी होना पडेगा अपडेट” अशी या मोहीमेची टॅग लाईन आहे. संपूर्ण शहरभर याचे बॅनर लागले आहेत .

- Advertisement -

स्वत: आणि सहकाऱ्यांवरसुद्धा गुन्हे दाखल

ओमी कलानी यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांचा विश्वासू साथीदार कमलेश निकम याने मनपा मुख्यालय समोरच एका आरटीआय कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती, याप्रकरणी निकम याच्याविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल झाला होता, या व्यतिरिक्त पक्षातील एका सदस्याविरुद्ध बलात्कारचा गुन्हा दाखल आहे, तर अन्य एकाच्या विरोधात आपल्याच पक्षातील उद्योजकाच्या कार्यालयात फायरिंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. शहरात अनधिकृत बांधकाम करण्यात या पक्षाचे अनेकजण सक्रिय आहेत, अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पक्षाने गुन्हेगारी संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र या पक्षातील लोकांनी स्वतः गुन्हेगारी सोडली तर शहरातील बरीचशी गुन्हेगारी कमी होईल, अशी टीका ओमी कलानी व त्यांच्या साथीदारांवर होत आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -