Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई दुसर्‍या विशेष फेरीत २१ हजार विद्यार्थ्यांना संधी

दुसर्‍या विशेष फेरीत २१ हजार विद्यार्थ्यांना संधी

दुसर्‍या विशेष फेरीसाठी मुंबई विभागात १ लाख ७ हजार ३१२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ३२ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये १० हजार विद्यर्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. तर ३ हजार ७२४ विद्यार्थ्यांना दुसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.

Related Story

- Advertisement -

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसर्‍या विशेष फेरीमध्ये २१ हजार ८३५ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. दुसर्‍या विशेष फेरीसाठी मुंबई विभागात १ लाख ७ हजार ३१२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ३२ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये १० हजार विद्यर्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. तर ३ हजार ७२४ विद्यार्थ्यांना दुसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.

दुसर्‍या विशेष फेरीमध्ये अनेक महाविद्यालयांचा कट ऑफ वाढल्याने अजूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. काही महाविद्यालयांचे वाणिज्य शाखेचे कटऑफ नव्वदीपारच राहिले. १० हजार विद्यर्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. तर ३ हजार ७२४ विद्यार्थ्यांना दुसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. यामध्ये कला शाखेच्या १ हजार ७५१ विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेच्या १४ हजार ८५४ विद्यार्थ्यांना तर विज्ञान शाखेच्या ४ हजार ९३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. एचसीव्हीसी शाखेमध्येप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २८७ आहे. पुढील फेरी विशेषकरून एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी असली तरी इतर विद्यार्थ्यांना ही त्यामध्ये संधी मिळणार आहे. मात्र पसंतीच्या महाविद्यालयात जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश कठीण होणार आहे. दुसर्‍या विशेष फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८ जानेवारीपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत मिळणार आहे. त्यानंतर पुढील प्रवेशाची प्रक्रिया जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -