घरमुंबईआमची मने जुळली आहेत

आमची मने जुळली आहेत

Subscribe

शिवसेना आणि भाजपची एकच विचारधारा असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्यामध्ये मतभेद होते; पण आता आम्ही मनाने एक झालो आहोत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला हाणला. गुजरातमधील गांधीनगरचे भाजपचे उमेदवार अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गांधीनगरमध्ये हजर राहिले होते. शहा यांना शुभेच्छा देताना ठाकरे यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊनच मी अमित शाहांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. गांधीनगरच्या या सभेत सर्वजण ‘मोदी, मोदी’चा जयघोष करत आहेत. त्यामुळे मी विरोधकांना आवाहन करतो की, त्यांचा नेता कोण आहे, हे त्यांनी सांगावे. दिल मिलेना मिले, हात मिलाओ असे म्हणतात. यांचे हात मिळालेले आहेत, मने मात्र मिळालेली नाहीत.

- Advertisement -

आमची मात्र मने जुळलेली आहेत. हिंदुत्त्व हा आमचा श्वास आहे. तो थांबला तर जगायचे कसे?, हात मिळवले; पण मनेच जर जुळली नाहीत तर फायदा काय अशा शब्दांत उद्धव यांनी विरोधकांवर तोफ डागली. मी इथे कसा असा अनेकांना प्रश्न पडला असून गांधीनगरला आल्याने अनेकांच्या पोटात दुखतंय अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -