घरमुंबईनवी मुंबईत स्कोडा गाडीने सात जणांना चिरडले; २ जणांचा मृत्यू

नवी मुंबईत स्कोडा गाडीने सात जणांना चिरडले; २ जणांचा मृत्यू

Subscribe

नवी मुंबईतील कामोठे सेक्टर ६ वसाहतीमध्ये संध्याकाळी सातच्या सुमारास भरधाव स्कोडा गाडीने सात जणांना चिरडले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

नवी मुंबईतील कामोठे सेक्टर ६ वसाहतीमध्ये संध्याकाळी सातच्या सुमारास भरधाव स्कोडा गाडीने सात जणांना चिरडले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. जखमींना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून एक जखमी महिला कामोठे येथील ओम साई हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.

नवी मुंबईतील कामोठे येथे स्कोडा कारची सात गाड्यांना धडक

नवी मुंबईतील कामोठे येथे स्कोडा कारची सात गाड्यांना धडक

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಜುಲೈ 21, 2019

- Advertisement -

जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु 

कामोठा वसाहतीमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास एका भरधाव स्कोडा गाडीने कामोठे सेक्टर ६ येथील रामशेठ ठाकूर विद्यालयासमोर सुमारे सात ते आठ वाहनांना धडक देत पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये वैभव गुरव (वय ३२) आणि सार्थक चोपडे (वय ७) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सार्थक चोपडे याची आई साधना चोपडे (वय ३०), प्रशांत माने, श्रद्धा जाधव (वय ३१), शिफा सारंग (वय १६), आशिक पाटील (वय २२) अशी जखमींची नावे असून त्यांना कामोठा येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्कोडा गाडी चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

इस्रोच्या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु; ‘चांद्रयान-२’ प्रक्षेपणासाठी सज्ज

‘जय श्रीराम’ घोषणेचा आग्रह करत मुस्लिम तरुणाला अज्ञातांकडून मारहाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -