आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या; पारधी समाजाची मागणी

Thane
Pardhi community wants market for diwali products selling
पारधी समाजाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

उल्हासनगर आणि अंबरनाथ हद्दीवर गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्या आणि तंबू मध्ये राहणारा राजपारधी समाज हा आजही शिक्षण आणि सरकारी सुविधांपासून वंचितच आहे. त्यांना कंगवे , करदोडे, कटलरी, गजरे अशाप्रकारचे सामान विकून आपल्या पोटाची खळगी भरावी लागते. दिवाळीच्या हंगामात ३० ते ३५ वर्षांपासून दारावरचे तोरण विकून हा समाज दोन पैसे जादा मिळण्यासाठी धडपडत असतो. त्यांना हा धंदा दारोदार फिरून किंवा बाजारपेठांमध्ये उभे राहून करावा लागतो. मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यांना वारंवार हटविण्यात येते. या फेरीवाल्यांना प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून सहकार्य करावे. आमच्यासारख्या गरिबांचीही दिवाळी साजरी होऊ द्यावी, असे साकडे राजपारधी फेरीवाला संघाने पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घातले आहे.

ठाणे मनपाच्या आडमुठेपणामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात

पारधी समाजाने दिलेल्या निवेदनानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त अच्युत हांगे यांना राजपारध्यांना सहकार्य करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत. ज्यावर आयुक्तांनीही व्यापारी आणि ग्राहकांना त्रास न होऊ देता शिस्तीने तोरण विक्रीचा व्यवसाय करण्याच्या सूचना शिष्टमंडळास दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत निदान आठ दिवसांत दोन पैसे जादा मिळून आपली दिवाळी गोड होईल, या आशेने राजपारध्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. यासाठी फेरीवाल्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाचे आभार मानले. शिष्टमंडळाचे प्रमुख नितीन मनोहर घोरपडे, सुनिता घोरपडे, सपना शिंदे, युवराज शिंदे, उदेश घोरपडे, सरला राजपुत आणि उदेश घोरपडे आदींचा समावेश होता.

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here