घरमुंबईपवन ज्यूस सेंटर मालकावर पुन्हा हल्ला, कालानींच्या कार्यकर्त्यांवर आरोप

पवन ज्यूस सेंटर मालकावर पुन्हा हल्ला, कालानींच्या कार्यकर्त्यांवर आरोप

Subscribe

पवन ज्यूस सेंटरच्या मालकावर दुसऱ्यांदा हल्ला करण्यात आला असून ओमी कलानींच्या कार्यकर्त्यांवर त्याने आरोप केला आहे.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पवन ज्यूस सेंटरच्या मालकावर पुन्हा तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. हा हल्ला टीम ओमी कालानीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप पवन गुप्ता याने केला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमन टॉकीज रोड या ठिकाणी पवन उर्फ जीत गुप्ता यांचे ज्यूस सेंटर आहे. पवन रात्रीच्या सुमारास ज्यूस सेंटर दुकान बंद करत असताना दोन अज्ञात इसमांनी ज्यूस सेंटरमध्ये येऊन पवनवर हल्ला केला. यात पवनच्या पाठीवर, डोक्यावर, हातावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला टीम ओमी कालानीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप पवन गुप्ता याने केला आहे. यापूर्वीही पवन गुप्तावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

पवनच्या पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न!

काही दिवसांपूर्वी पवनची पत्नी प्रियंका हिने न्याय मिळत नसल्याचे सांगत मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे. याप्रकरणी टीम ओमी कालानीचा प्रवक्ता निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.


वाचा सविस्तर – मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -