कोपरीतील 108 गाळेधारकांचा प्रश्न 20 वर्षापासून प्रलंबित

15 दिवसांत निर्णय न दिल्यास आंदोलन

Mumbai
ठाणे महानगरपालिका फोटो

एकात्मिक रस्तारुंदी प्रकल्पाअंतर्गत 1996 ते 1998 दरम्यान ठाण्यातील कोपरी विभागातील सुमारे 108 दुकाने आणि गाळे बाधित झाले होते. ठाणे महानगर पालिकेने या सर्वांना पुन्हा स्थापित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 20 वर्षाचा कालावधी होऊनही याबाबत ठामपाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. याबाबत अनेक वेळा मोर्चे आंदोलने निदर्शन करण्यात आली. तरीही बाधित झालेल्या नागरिकांना न्याय मिळाला नाही. ठाणे महानगर पालिकेने या बाधित झालेल्यांचे लवकरच पुनर्वसन केले नाही तर महापालिकेच्या मुख्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्याचा इशारा बाधित झालेल्या दुकानदारांच्या वतीने देण्यात आला आहे.

ठाणे पूर्व कोपरी येथील रस्तारूंदीकरणातील 108 वाणिज्य बाधितांचे पुनर्वसन मागील 20 वर्षापासून रखडलेले आहे. ठामपा क्षेत्रातील आजपर्यंत झालेल्या इतर ठिकाणच्या रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन तुलसीधाम ठाणे बीएसयुपी योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. यामध्ये अनेक बाबी बेकायदेशीर असल्याच्या उघड झाल्या आहेत. मात्र 20 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

सदर 20 वर्षापासून रखडलेल्या पुनर्वसनाची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण विस्थापित गाळे व निवासस्थान यांची एकत्रित यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून रस्ता रुंदीकरणातील एकूण बाधितांना वाणिज्य गाळे व निवासस्थान वाटपाबाबत येत्या महासभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल
-मनिष जोशी, उपआयुक्त , ठाणे महानगर पालिका

मागील 20 वर्षापासून हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला आहे. मागील पाच-सहा वर्षापूर्वी झालेल्या बाधितांचे पुनर्वसन झाले मात्र कोपरीतील या 108 जणांच्याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय होत नाही. यामध्ये पक्षीय राजकारण असल्याचे दाट संशय येत आहे. त्यासाठी प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे महानगर पालिकेला इशारा दिला आहे. लवकरात लवकर निर्णय न झाल्यास बाधित नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– अ‍ॅड. अजय तापकीर, कोपरी ठाणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here