घरदेश-विदेशदरवाढ काही थांबेना; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले

दरवाढ काही थांबेना; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले

Subscribe

मुंबईमध्ये आज पेट्रोलचा भाव ७६.११ रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर, डिझेल भाव ६७.८२ रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा वाढल्याचे चित्र दिसले आहे. काल (बुधवारी) पेट्रोलचे भाव घसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांंना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र, आज (गुरुवारी) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वधारले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या दरात ०.१४ पैशांनी वाढ झाली असून, पेट्रोलचा दर ७०.४७ रुपये प्रतिलिटरवर पोहचला आहे. तर डिझेल ०.१९ पैशांनी वाढले असून, डिझेलचा आजचा दर ६४.७८ प्रतिलिटर इतका आहे. मुंबईमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरात काही अंशी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ०.१४ पैशांनी वाढले असून, आजचा भाव ७६.११ रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर, डिझेलच्या दरात ०.२० पैशांनी वाढ झाली असून मुंबईत डिझेलचा आजचा भाव ६७.८२ रुपये प्रतिलिटर झाला आहे.

बुधवारी डिझेलची दरवाढ कायम होती पण पेट्रोलची किंमत कमी झाली होती. मात्र, आज डिझेलसोबतच पेट्रोलच्या दरातही वाढ झाल्यामुळे वाहनचालकांना त्याचा फटका बसणार आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी (२०१८) अखेरच्या काही दिवसांमध्ये इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यामुळे देशातील वाहनचालकांना चांगलाच दिलासा मिळाला होता. बाजारातील अन्य वस्तूंच्या वाढलेल्या किंमतीही इंधनाचे दर घटल्यामुळे साहजिकच कमी झाल्या होत्या. त्यामुळे वर्षाअखेरीस सर्वसामान्य नागरिक काहीसे सुखावले होते. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात इंधनाच्या दराने उचल खाल्ली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीमधील चढ-उतारामुळे देशातील इंधनाचे दरही वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -