घरमुंबईतरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड; प्रियकराला अटक

तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड; प्रियकराला अटक

Subscribe

तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून तिची बदनामी करणाऱ्या प्रियकराला अटक केल्याची घटना समोर आली आहे.

कॉलेज तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून तिची तिच्याच माजी प्रियकराने बदनामी केल्याची घटना बोरीवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच २१ वर्षांच्या आरोपी प्रियकराला गोराई पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरीवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी एकाच परिसरातील रहिवाशी असल्याने आरोपीचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

नेमके काय घडले?

२० वर्षांची तक्रारदार तरुणी ही बोरीवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून ती सध्या कॉलेजमध्ये शिकते. आरोपी तरुण याच परिसरात राहत असून ते दोघेही बालपणीचे मित्र आहेत. एकाच शाळेत आणि नंतर एकाच कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. सध्या तो गोराई परिसरातील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने तिला प्रपोज केले होते, तो तिला आवडत होता. त्यामुळे तिनेही त्याला होकार दिला होता. काही महिने त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडेच त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्यातून तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याच्याशी बोलणेही तिने बंद केले होते. यावेळी त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे लक्षात येताच तो प्रचंड संतापला होता. त्यामुळे त्याने तिचे असलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. यावेळी त्याने तिच्याविषयी अश्लील मजकूर दिला होता. हा प्रकार या तरुणीच्या भावाच्या निदर्शनास येताच त्याने तिला विचारणा केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या भावाला सांगितला. या माहितीनंतर त्यांनी गोराई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी माजी प्रियकराविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा नोंद होताच त्याला सोमवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी बोरीवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही पहा –  Video : चक्क माकड काढतंय पोलिसाच्या डोक्यातल्या उवा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -