घरमुंबईआरक्षित भूखंड महापालिकेच्या गळ्यातील हड्डी!

आरक्षित भूखंड महापालिकेच्या गळ्यातील हड्डी!

Subscribe

आरक्षित जमिनीचीही किंमतही सरासरी ४०० ते ६०० टक्क्यांनी वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घाटकोपर किरोळ विभागातील आरक्षित रस्त्यांसाठी जमीन संपादन करण्यासाठीचा खरेदी सूचनेचा प्रस्ताव सुधार समिती व महापालिकेने २०१६ मध्ये मंजूर केला. परंतु या रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात मे २०१८ रोजी निवाडा घोषित झाल्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी निश्चित केलेल्या २.०६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम ८.६२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे तब्बल ४१८ टक्क्यांनी जमिनीची किंमत वाढल्याचे दिसून आले असून अशाचप्रकारे तुर्भे येथील खेळाचे मैदान, बोरीवलीतील उद्यान, भायखळा येथील राणीबागेचा विस्तार तसेच कांदिवलीतील एक्सर गाव येथील उद्यान, खेळाचे मैदान, महापालिका दवाखाना, प्रसुतीगृह आदींच्या आरक्षित जमिनीचीही किंमतही सरासरी ४०० ते ६०० टक्क्यांनी वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

म्हणून जागांचे मुल्य वाढले

मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित जमिनी ताब्यात घेण्यासाठी खरेदी सूचनांचे प्रस्ताव मंजूर केले जातात. विकास आराखड्याच्या पहिल्या दहा वर्षांमध्ये आरक्षित जमिनी ताब्यात घेण्यासाठी विकास हस्तांतरण हक्क अर्थात टिडीआरचा लाभ दिला जातो. तर त्यानंतरच्या वर्षात या जमिनी ताब्यात घेण्यासाठी रक्कम मालकाला दिली जाते. सद्यस्थितीत १५२ भूसंपादचे प्रस्ताव हे सुधार व महापालिकेत मंजूर करून विविध टप्प्यांवर त्यांची प्रगती सुरु आहे. यापैकी १६ प्रस्ताव हे न्यायप्रविष्ट आहेत. भूसंपादनाखालील जमिनी या संपूर्णत: मोकळ्या, पूर्णपणे भारग्रस्त किंवा अंशत: भारग्रस्त अशा स्वरुपाच्या आहेत. तर काही जमिनी या सीआरझेडमध्ये मोडणार्‍या आहेत. ज्या भूसंपादन प्रस्तावाला ३१ डिसेंबर २०१३ रोजीच्या पूर्वी निवाडा घोषित करण्यात आलेला नाही. अशी भूसंपादन प्रकरणे ही भूसंपादन करताना वाजवी मोबदला मिळण्याचा हक्क आहे. त्यानुसार जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही निवाडा प्रक्रिया केल्यामुळे अनेक भूसंपादनांमध्ये जागेचे मुल्य वाढलेले पाहायला मिळत आहे. जमिनीचे मुल्यांकन हे रेडीरेकनरच्या मार्गदर्शनानुसार तसेच वार्षिक दराच्या आधारानुसार निश्चित करण्यात येते. त्यामुळे प्रारुप निवाडा तसेच निवाड्याची रक्कम महापालिकेने केलेल्या अंदाजित मुल्यांकनापेक्षा खूपच जास्त असलयाचे दिसून येते, असे महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – अनधिकृत कार पार्किंगवरील कारवाई आता जोरात

विभाग : एम/पूर्व, तुर्भे

जमिनीचे आरक्षण व भाग : खेळाचे मैदान, २९१(भाग)
जमिनीचे निश्चित केलेले मुल्य :१.५९ कोटी रुपये
भुसंपादन अधिकार्‍यांनी केलेले मुल्यांकन : ३.८१ कोटी रुपये
वाढलेली टक्केवारी : २३९.१५ टक्के

विभाग : आर/मध्य

जमिनीचे आरक्षण व भाग : उद्यान, ४५५(भाग), ४५६,४५७
जमिनीचे निश्चित केलेले मुल्य :९२.०६ कोटी रुपये
भुसंपादन अधिकार्‍यांनी केलेले मुल्यांकन : २०५.७५ कोटी रुपये
वाढलेली टक्केवारी : २२३.५० टक्के

- Advertisement -

विभाग : ई विभाग, माझगाव

जमिनीचे आरक्षण व भाग : वीर जिजामाता भोसले उद्यानाचा विस्तार, ५१९,१/५९१
जमिनीचे निश्चित केलेले मुल्य : १४३.१७ कोटी रुपये
भुसंपादन अधिकार्‍यांनी केलेले मुल्यांकन : ५७७.०९ कोटी रुपये
वाढलेली टक्केवारी :४०३.०७ टक्के

विभाग : आर/उत्तर, एक्सर गाव

जमिनीचे आरक्षण व भाग : उद्यान, रुग्णालये, खेळाचे मैदान,दवाखाना, महापालिका प्रसुतीगृह, रस्ते
जमिनीचे निश्चित केलेले मुल्य : ५४.८८ कोटी रुपये
भुसंपादन अधिकार्‍यांनी केलेले मुल्यांकन : ३३६.०९ कोटी रुपये
वाढलेली टक्केवारी : ६१२.३८ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -