घरमुंबई...तर राज्यात पीआरपी 51 जागा लढवणार

…तर राज्यात पीआरपी 51 जागा लढवणार

Subscribe

प्रा. जोगेंद्र कवाडे यांची ठाण्यात घोषणा

रिपब्लिकन विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकशाहीचा विचार महाराष्ट्रातून संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांच्याद्वारे करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप पीआपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी केला. प्रा कवाडे यांनी बोलताना सांगितले प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी केली त्यात बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाला स्थान दिले नाही. जर प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचे विचार अंगिकारायचे असते तर सोलापुरात सुशील कुमार शिंदे यांच्यासमोर उमेदवार दिला नसता. भाजपची मंडळी वंचित आघाडी चालवीत असण्याची शक्यताही प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रा. कवाडे म्हणाले सध्या आम्ही महाआघाडीचे घटक आहोत. जाग वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. समाधानकारक न्याय आघाडीने न दिल्यास आम्ही समविचारी पक्षाला सोबत घेऊन 51 जागा विधानसभेच्या लढवू असा इशाराही कवाडे यांनी दिला.

राज्यात कोल्हापूर, सांगली आदींसह इतर काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना दुसरीकडे भाजपचे नेते मंडळी शासकीय मदत पाकीटांवर आपले स्टीकर लावून प्रचार करताना दिसत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शिवाय अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्री मात्र जनादेश यात्रेत मश्गुल असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आता ही यात्रा बंद असली तरी ती पुन्हा सुरू होणार आहे. तिकडे देशाचे गृहमंत्री पूरग्रस्त भागांचा हेलिकॉप्टरद्वारे पाहणी दौरा करुन गेले, परंतु त्यांच्या सोबत मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांना येथील काय परिस्थिती समजणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -